Uncategorized

चवदारतळे सत्याग्रह दिनानिमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

पुणे : दि. २२. पिंपरीतील बहुजन समाज बांधवांना तळ्याचे पाणी मिळावे पाणी हे नैसर्गिक अमुल्य देणगी आहे ते सर्वांसाठी खुले व्हावे व दलितांना सार्वजनिक गाव पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी व पाण्याचा अधिकार मिळावा यासाठी महामानव

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो बांधवांच्या उपस्थितीमध्ये महाड येथे सत्याग्रह केला. या लढ्याची आठवण तसेच ‘समतेचे प्रतीक’ म्हणून लाखो बांधव या चवदार तळ्याला मोठ्या संख्येने भेटी देतात.असे विचार वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड शहर माजी उपाध्यक्ष संतोष जोगदंड यांनी व्यक्त केले.

पिंपरीत भीम सृष्टी येथे चवदारतळे सत्याग्रह दिनानिमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय बौद्ध महासभा सह विविध बहुजन बांधवांच्या वतीने महा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे पिंपरी चिंचवड माजी शहराध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, भीमशाही युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे, वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड माजी उपाध्यक्ष संतोष जोगदंड ,सामाजिक कार्यकर्ते विजय कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button