खडकीत शिवसेना (उबाठा गट) यांच्या वतीने छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
पुणे : दि. १९. खडकीतील शिवसेना शाखा (उबाठा गट) आणि साहेब प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त आरोग्यशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अरोग्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शिव अरोग्य सेनेच्या रमेश क्षीरसागर, जयश्री वैद्य, मनोज वासु, अजय परदेशी, स्वपनिल जोगदंड, ऊँकार मारणे, अमर कंक यांचा सन्मान पुणे शहराचे प्रमुख गजानन थरकुडे, पृथ्वीराज सुतार, आनंद गोयल, रेखाताई कोंढे, राजेंद्र शिंदे, मकरंद पेठकर यांच्या वतीने करण्यात आला. या शिव जयंतीचे आयोजन उपशहर प्रमुख प्रशांत राणे, विभाग प्रमुख हेमंत यादव, उपविभाग प्रमुख प्रकाश चौरे, हाजी बदरुद्दीन शेख, मनिष बासु, करुणा घाडगे, स्नेहल पृथ्वीराज,मिथुन गवळी, मैथ्यु लाजरस, अजित बांदल, अरुण गोंटे,कालुराम बराथे, शाम केदारी यांनी केले.