खडकीतील एका १७ वर्षीय तरुणाला महादेववाडी येथील जंगलात नेऊन नग्न करुन पट्ट्याने मारहाण
पुणे : दि. १९..पुण्यतील खडकी महादेववाडी येथील एका १७ वर्षीय तरुणाला जंगलात नेऊन नग्न करुन जबर पट्ट्याने मारहाण करण्यात आली. तरुणाच्या शरीरावर अनेक ठिकाणी धारदार शत्राने जखमा करून झालेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी खडकी बाजार येथे राहणार्या एका १७ वर्षाच्या युवकाने खडकी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. पोलीसांनी याप्रकरणी वैभव ऊर्फ पांड्या आगलावे (वय २९), यश चांदणे (वय २२) यांच्यासह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीससूत्रानुसार तक्रादार तरुण हा येरवडा येथील मित्राच्या वाढदिवसाला जाण्यासाठी राणी लक्ष्मीबाई उद्यान जवळील बसस्टॉपवर बसची वाट पाहत होता. तेव्हा त्याच्या जवळ वैभव आगलावे आला. त्याने त्या तरुणाला फिरुन येऊ म्हणून त्या तक्रारदार तरुणाला गाडीवर बसवून महादेववाडी येथील जंगलात घेऊन गेल्याने तेथे आधीच त्याच्या ओळखीचे ९ ते १० मुले बसलेली होते. तेव्हा ते म्हणाले आता घावला आता याला सोडायचे नाही. या सर्वांनी मिळून कमरेच्या पट्ट्याने आळी पाळीने मारहाण केली. वैभव याने यश चांदणे याला व्हिडिओ कॉल लावला. तेव्हा आरोपी यश चांदणे याने सर्वांना सांगितले कि त्याचे कपडे काढा व त्याला नागडा करुन फटके मारून त्याच्या मानेवर, शरीरावर, पाठीवर तसेच त्याचा पायावर धारदार शस्त्राने जखमा केल्या. तक्रारदार हा लंगडत चालताना पाहून त्यांच्या आईने विचारणा केल्यावर त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. अधिक तपास खडकी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिग्जिय चौगुले तपास करीत आहे.