वाहतूक समस्या

वाहतूक पोलीस हे वाहतूक नियमन, नियंत्रण पथक का? वसुली पथक

पुणे : दि. २४. पुणे हे विद्याचे महेर घर म्हणून प्रसिद्ध आहे पण सध्या पुण्याची ओळख हि उद्योग, आयटी  व इतर क्षेत्रात नाव उंचावत आहे. पुण्याचा विकास होत गेला. पुण्यात सुरक्षित वातावरण व परिस्थित असल्याने विस्तार वाढत गेल्याने पुण्याची लोकसंख्याही वाढत गेली. त्याच बरोबर रस्त्यावरील वाहतूकही वाढत गेली. प्रत्यक्ष घरात २ चाकी, ३ चाकी  आणि ४ चाकी वाहनात भर पडत गेली. व ती रोज वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची गर्दी होऊ लागल्याने चालकांना व नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी व वाहतूक समस्या इतकी गंभीर झाल्यामुळे हिंजेवाडी येथील परदेशी कंपनीतील अधिकारी व कामगारांना या या वाहतूक कोंडीच्या त्रासामुळे गाशा गुंडाळावा लागला.

वाहतूक नियंत्रणाकरीता हि पोलीस दलात वाहतूक नियंत्रण शाखा हा स्वतंत्र विभाग असून वाहतूक नियंत्रण करण्याची जबाबदारी हि पुणे पोलीस वाहतूक शाखा चोखपणे करीत असते. या विभागास जे नाव देण्यात आलेलं आहे. त्याचा विचार करता पुणे पोलीसांची वाहतूक नियंत्रण शाखा हि रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करणे, वाहतूक कोंडी होऊ न देणे. हे काम वाहतूक शाखा  करीत असते . हे भासविण्यात येते. या म्हणण्याचा अर्थ असा कि वाहतुकीस खऱ्या अर्थाने शिस्त लावली जाते का? याचा विचार पोलीसांची वाहतूक नियंत्रण करीत नसावी. हे वास्तव चित्र सध्या पुणे जिल्ह्यात दिसत आहे. वाहतूक नियंत्रण शाखेच्या या विभागात रस्त्यावरील वाहतुक नियंत्रण हे महत्वाचे काम वाहतूक पोलीसांचे असते. वाहतूक नियंत्रण या नावातच सर्व अभिप्रेत आहे. वाहतूक नियंत्रण म्हणजे वाहतुकीस शिस्त लावणे. वाहतूक सुरळीत ठेवणे. वाहतूक कोंडी टाळणे. या करिता या विभागास वाहतूक नियंत्रण संबोधले जाते. सध्याच्या स्थितीत वाहतुकीचे  नियंत्रण होते का? याचे उत्तर नाही असेच चित्र दिसून येते.

पूर्वीच्या काळी आधुनिक सिग्नल यंत्रणा नव्हती. प्रत्यक्ष चौकात फक्त एकच वाहतूक पोलीस ( आडोशाला टोळक्याने उभे न राहता आपल्या हाताने, शिटी द्वारे वाहतुकीवर नियंत्रण करीत होते. त्या एकट्या पोलीसांचा वाचक व भीती वाहन चालकावर असे. त्या एकट्या पोलीसाचा अभिमान वाटत असे. त्या एकट्या पोलीसा मार्फत वाहन चालकांकरिता हाताने करण्यात येणाऱ्या इशाऱ्याकडे सर्व वाहन चालकांचे लक्ष असे. ऊन, वारा थंडी  तसेच पावसात भिजत रस्त्याच्या चौकात मधोमध कशाचीही पर्वा न करता तो पोलीस वाहतुकीवर नियंत्रण व  नियमन करीत असे. याला वाहतूक नियंत्रण व नियमन म्हणतात. कोना चालकाची काय हिंमत. धाडस किव्हा माजल नव्हती कि त्याचा इशारा तोडण्याची व निघून जाण्याची. सिग्नल तोडल्याचा गुन्हा त्या कालिदाखल होत नव्हता. तो व्यक्तिशः हजार असल्याने ती जबर वाहन चालकावर होती. सध्या आधुनिक सिग्नल आल्याने यंत्रणा आली. चौका चौकात खांब उभे राहिले.. ब चौकातून पोलीस गायब झाले. चौकात पोलीस उभा नसल्याने वाहन चालकांवर वाहचक राहिला नाही. वाहतुक पोलीस उभा नसल्याने पोलिसांचे वाहतूक नियंत्रण व नियमन हे आवश्यक कर्तव्य बंद झाले.

सध्या वाहतूक पोलीसांचे वाहतूक नियंत्रण करण्याएवजी वाहन चालकांवर दंड वसुली करणे एवढेच काम वाहतूक पोलीस जोमात व दिमाखात करताना आढळत आहे. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याऐवजी चौकात रस्त्याच्याकडेला, आडोशाला ६ ते ७ च्या टोळक्याने उभे राहून वाहन चालकांकडून दंड वसुली करण्यातच आपली यंत्रणा राबवली जात आहे. पोलीस चौकात ना थांबता. आडोशाला थांबून वाहन चालकाला नियम तोडण्यास उत्सुक करतात. नंतर त्याला अडवून त्याच्या गाडीची प्रथम चावी काढण्याचा बेकायदेशीर प्रकार केला जातो. कायद्यात वाहनांची चावी काढून घेण्याची तारेतून , नियम नाही. अशा प्रकारे वाहचालकाच्या व्यक्तित्वावर, चालकाच्या अधिकारावर प्रतिबंध करतात. वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी टोळक्याने दंड वसूली करणे हेच काम वाहतुकीस शिस्त लावण्याच्या नावाखाली सर्रस पाने केलं जातं असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात येथे कि इतक्या वाहन चालकांकडून इतकी दंड वसुली केली. असे वृत्तपत्रातून व वाहिन्यातून सांगण्यात येते. मात्र दंड वसुली केल्याने वाहतूक सुरळीत होत नाही. किव्हा शिस्तही लागत नाही. वाहनचालक वाहतूक पोलीसांना १०० -२०० रुपये देऊन आपली सुटका करून घेतो. पण दंड वसुली केल्याने वाहनचालकाच्या किव्हा वाहतुकीस सुधारणा झाली असे म्हणता येणार नाही. वाहतूक पोलीस नियंत्रण शाखेने फक्त दंड वसुलीचा इतका ध्यास घेतला आहे.चालकाला पकडल्यास चालक दंडाऐवजी अर्थपूर्ण बोलणी करून सुटका करून घेणे. हि मानसिकता निर्माण झाली आहे. व हेच चित्र प्रत्यक्ष चौकात रोज दिसत आहे.

वाहतूक पोलीसांनी फक्त दंड वसुली करून वाहतूक सुरळीत होत नाही. वाहन चालकास किव्हा वाहतुकीस शिस्त लागत नाही. पोलिसांनाही वाहतुकीवर नियंत्रण करायचे नसून आडोशाला टोळक्याने उभे राहून फक्त दंड वसुली करायची असते. हि वसुली करण्यासाठी प्रत्यक्ष वाहतूक पोलीसाला एका दिवसाचे उद्देश (टार्गेट) रक्कमेबाबत निश्चित करून देण्यात आलेले असते.तेवढ्याच रक्कमेचे उद्दीष्टे (टार्गेट) पूर्ण करण्यातच त्यांची मानसिकता असते. ते उद्दीष्टे (टार्गेट) पूर्ण केल्यावर तो स्वतःचे उद्दीष्टे (टार्गेट) पूर्ण करण्यासाठी भर देतो. या सर्व परिस्थितीची जाणीव नागरसेव, आमदार, खासदार, मंत्री याना असते. परंतु. यांना जनतेचे काही घेणेदेणे नसते . नागरिकांना त्रास झाल्याशिवाय नागरिक आपल्याकडे येणार नाही. आपले अस्थित्व अभाधिट ठेवण्यासाठी त्यांचा हा उद्देश असतो.

वाहतूक पोलीसांनी कामात सहकार्य करण्यासाठी वार्डन नावाचे फॅड सुरु झाले आहे. वार्डनचे काम वाहतूक पोलिसांना मदत करणे एवढे आहे. परंतु हे वार्डन स्वतःला पोलीस आयुक्त समजून वाहन चालकाच्या गाड्या अडवून त्यांच्याकडे परवाना, गाडीचे कागदपत्र मागतात. हे काम त्याचे नसून ते पोलीसांचे एजंट म्हणून ते सर्व वसुलीचे काम करीत असलयाने त्याचा उर्मटपणा वाढला आहे. वाहतूक पोलीस ठराविक लोकांची वसुली करते. उदा. दुचाकी, तीनचाकी टेम्पो, रिक्षा चालक, भाजीपाला विक्रेता टेम्पो अशा गरीब वर्गातील व्यक्तींना वेठीस धरतात. परंतु आलिशान कर चालकास हात लावीत नाही. या सर्व बाबी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहित नसतात असे म्हणणे घटक होईल. जर खरच माहित नसेल तर त्यांची या गोष्टीची दाखल घेतली पाहिजे. पोलिसांनी टोळक्याने व आडोशाला उभे न राहता चौकात उभे राहून वाहतुकिचे नियंत्रण करण्याचे आदेश देण्यात यावे. एकदा पोलीस जर चौकात उभा राहून वाहतूक नियंत्रण करतांना दिसला तरी वाहन चालक नियम तोडण्याची हिंमत करणार नाही. फक्त दंड वसुली करून वाहतुकीस शिस्त लावली जात नाही. आहे.

तसेच वाहतूक पोलीसांवर सर्व जबाबदारी न टाकता सर्व वाहन चालकांनी देखील शिस्तीत वाहतुकीचे नियमाचे पालन केल्यास वाहतूक कोंडीस आला बसेल. वेगात गाडी चालवणे. सिग्नल तोंडाने. बेदरकपणे वाहन चालवून स्वतःच्या व इतरांच्या जीवितास धोका उत्पन न करता. वाहन चालविल्यास वाहतूक पोलीस वसुली करणार नाही. या सर्व बाबींची गाबीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतल्यास तसेच वाहन चालकांनी देखील आपल्यात सुधारणा केल्यास पुण्यातील वाहतूक कोंडी सुटण्यास वेळ लागणार नाही. हि अपेक्षा समस्त वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button