Uncategorized

खडकी येथील सेंट मेरी कथिड्लच्या वतीने झावळ्यांचा रविवार निमित्त भव्य मिरवणूक

पुणे : दि. १४. झावळ्यांचा रविवार निमित्त खडकी येथील सेंट मेरी कथिड्लच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खडकी परिसरातील ख्रिश्चन धर्मियांकडून झावळ्याचा रविवार मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या काढलेल्या फेरीत लहान मुलांन पासून ते वयोवृद्ध ख्रिश्चन बांधवानी सहभागी झाले होते. झावळ्यांचा रविवार निमित्त खडकी येथील सेंट मेरी कथिड्लच्या वतीने या फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

झावळ्यांचा रविवार निमित्त खडकी येथील सेंट मेरी कथिड्लच्या चर्च येथे झावळ्याच्या रविवारची उपासना पारंपरिक पद्धतीने करण्यात आली. सकाळी ८ वाजता खडकी येथील सेंट मेरी कथिड्लच्या वतीने झावळ्यांची फेरी काढण्यात आली. यावेळी येशू ख्रिस्ताचे स्वागत झावळ्यांनी केले जाते. झावळ्यांचा रविवार म्हणजे इंग्रजीमध्ये पाम संडे म्हणून साजरा केला जातो. हा ख्रिश्चन धर्मियांचा एक महत्त्वाचा सण आहे. हा सण ईस्टर संडेच्या एक आठवड्यापूर्वी साजरा केला जातो. या दिवशी येशू ख्रिस्ताने जेरुसलेम शहरात प्रवेश केला, तेव्हा लोकांनी त्याचे स्वागत झावळ्या आणि नारळाच्या फांद्यांनी केले. या घटनेची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो. याप्रसंगी ख्रिश्चन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी चर्चचे धर्मगुरू व सेंट मेरी चर्चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button