दापोडी, सांगवी, फ़ुगेवडी येथे ईस्टर संडे मोठ्या उत्सहात साजरा
पुणे धर्मपांत बिशप अल्फर्ड तिवडे यांचा उपदेश

पुणे : दि. २०. पुनरुत्थान म्हणजे कुठला प्रकारचे जाती भेदभाव न करणे पुणे धर्मपांत बिशप अल्फर्ड तिवडे यांनी उपदेश दिला आहे. प्रभू उठला आहे. खरोखर उठला आहे. ४० दिवस उपावास झाल्यानंतर प्रथम झावळ्ययांचा तसेच गुड फ्रायडे व त्यानंतर येणारा रविवार म्हणजे ख्रिस्ती बांधवांचा ईस्टर संडे हा सण मोठ्या प्रमाणात सांगवी दापोडी फुगेवाडी कासरवाडी येथे चर्च मध्ये एकत्रीत आनंदात साजरा करण्यासाठी ख्रिस्ती बांधव एकत्र येतात. ईस्टर संडे निमित्त शहरातील वेगवेगळ्या चर्चमध्ये पहाटे दापोडी येथील चर्च, तसेच पहाटे सालवेशन आर्मी चर्चचे भक्तगण, मेणबत्ती लावून प्रभू उठला आहे. खरोखर उठला आहे. हे घोषवाक्य देत संपूर्ण परिसरातुन कॅन्डल मार्च काढून यावेळी प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती गाणं गात सर्व ख्रिस्ती महिला व पुरुषांनी एकत्र येऊन कॅन्डल लावुन पहाटे मिरवणूक काढून सहभागी झाले होते. यावेळी चर्च मधील एकमेकानां ईस्टर संडे निमित्त गुलाब देऊन तसेच केक भरून ईस्टर संडेच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संजय नाना काटे अलेक्स दास जीवन काळे दाविद बळीद यांनीं दिन दलित गोरगरिबांना कपडे घेऊन या ईस्टर संडेच्या शुभेच्छा देण्यात आले यावेळी नवा करार मंडळी तर्फे सुनंदा त्रिभुवन यांनी संदेश दिला आहे. व यावेळी सेंट मेरी कथिड्रल चर्च येथे पुणे धर्म प्रांताचे बिशप रेव्ह. अल्फर्ड तिवडे यांनी लहान मुलांना मिठाई भरून त्यांना ईस्टर निमित्त शुभेच्छा दिल्या आपल्या संदेशात जातीय भेदभाव न करणे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान आपला प्रभू येशू ख्रिस्ताने आपण केलेल्या पापांच्या क्षमेसाठी, आपले प्राण देऊन पुन्हा तिसऱ्या दिवशी उठले आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्यावर नेहमी प्रेम करतो त्यामुळे आपण ईस्टर हा सण गोरगरीब दिनदलितां बरोबर साजरा करावा चर्चमध्ये भक्ती संदेश सहभागीता यांचे आयोजन करण्यात आले होते. याव्हे निस्सी ख्रिश्चन असोशिएशन चे अध्यक्ष नितिन गोरडे रितेश गोरडे विल्यम चंदनशिव सतीश पठारे यांनी यावेळी विधवा महिलांना ईस्टर सण साजरा करण्यासाठी भेट देण्यात आले यावेळी होली क्रॉस चर्च सालवेशन आर्मी चर्च, विनीयार्ड वर्क्स चर्च इत्यादी चर्चमध्ये प्रार्थना व संदेश देण्यात आले