Uncategorized

खडकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची जोरदार तयारी

पुणे : दि. ०८. दर वर्षी १५२ देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तसेच भारतातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. यावेळी खडकीतील आकाश यंग ग्रुपच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंतीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. दर वर्षी प्रमाणे आकाश यंग ग्रुपने १०*७० बॅनर लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ३२ डिग्री लिहून समाजप्रबोधनचे कार्य केले आहे. आधी शिक्षण व नोकरी. पोटापाण्याचा प्रश्न सोडवल्यावर समाजकारण व राजकारण करावे. हा या मागचा उद्देश आहे. या बॅनर मधील डिग्री पाहून सर्व समाजातील मुला मुलींनी त्याचा आदर्श घेऊन जास्तीस जास्त शिक्षण घेतले पाहिजे. असा संदेश खडकीतील आकाश यंग ग्रुप याच्या वतीने करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button