Uncategorized

खडकीतील वंदे मातरम् संघटनेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

पुणे : दि. १८. खडकी येथील वंदे मातरम् संघटनेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी खडकी कॅन्टोमेंट बोर्डाचे माजी. आरोग्य अधिकारी पी. डी कांबळे व वंदे मातरम् संघटनेचे प्रांत अध्यक्ष राजेश शर्मा यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेशी पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी जय भीमच्या सामूहिक घोषणांमुळे वातावरण भारून गेले होते. संघटनेचे पदाधिकारी राजेश काकडे यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर आधारित एक भावनिक भाषण आणि कविता सादर केली. या दिवशी केवळ एक कार्यक्रम नव्हता, तो होता स्वाभिमानाचा जागर, आत्मगौरवाचा उत्सव. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ होते. त्यांच्या स्मृती आणि विचारांचे प्रेरणास्त्रोत हा दिवस साजरा केला जातो. या कार्यक्रमामुळे अनेकांचे डोळे पाणावले. यावेळी खडकी संघाना अध्यक्ष शिरीष रोच, आनंद रेड्डी, राजेश राजपूत, करण चव्हाण, दीपक चार्य, मनीषा कांबळे, अनिल भोसले, निलेश कांबळे सचिन शेंडगे, विनोद माठे व इतर भीम सैनिक उपस्थित होते. याकार्यक्रमचे सूत्रसंचालन व आभार राजेश काकडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button