लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ससून रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या घरांवर छापा; कोटींचे मलमत्ता जप्त

पुणे : दि. ०३.पुण्यात सतत चर्चेत असणाऱ्या ससून दवाखान्यातील २ वैद्यकीय अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरांवर छापा मारल्याने मोठ्या प्रमाणात कोठ्यावधी बेहिशेबी मालमत्ता सापडल्याने आहे. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पोलीससूत्रानुसार पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ससून दवाखान्यातील जयंत पर्वत चौधरी (वय ४९) यांच्या घरातून ३९ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली असून सुरेश विश्वनाथ बोनवळे (वय ५३) यांच्या घरात एकूण १ कोटी ३५ लाख ९५ हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला या दोन्ही वैध्याकिया अधिकाऱ्यांच्या तक्रारी जात होत्या. त्यातच बुधवारी १ लाख रुपयांची लाच घेताना ससून दवाखान्यातील दोन अधिकाऱ्यांना रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आली. नंतर त्या दोघांच्या घरावर आज सकाळीच छापा मारण्यात आला. यात कोठ्यावधी मलमत्ता सापडली. अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करीत आहे.