Uncategorized
पुण्यातील चंदननगर येथे १२ सिलेंडर स्फोट तर ४० पेक्षा जास्त झोपड्या जाळून खाक

पुणे : दि. २३. पुण्यातील चंदननगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून जवळपास १२ सिलेंडरचा स्फोट होऊन सुमारे ४० पेक्षा जास्त झोपड्या जाळून खाक झाल्या. या आगीवर नियंत्रण मिळवले असून १५० पेक्षा जास्त सिलेंडर बाहेर काढण्यालत अग्निशमन दलाला यश मिळाले. या आगीत जीवित हानी झाली नसून आर्थिक हानी मोठ्या प्रमाणावर झाला असल्याचा प्राथमिक माहिती समोर आली आहे. हि आग आटोक्यात जाण्यासाठी सुमारे १५ अग्निशमन वाहने व अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे व ८० जवान दाखल झाले होते. ही आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही.