Uncategorized

खडकीतील अखिल खडकी बौद्ध समाज कृती समिती व सम्राट अशोक प्रतिष्ठाणच्या प्रयत्नांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक स्तंभाचे उदघाटन

पुणे : दि. १५. खडकीतील अखिल खडकी बौद्ध समाज कृती समिती व सम्राट अशोक प्रतिष्ठाणच्या वतीनेच्या प्रयत्नांनी वतीने बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधुन खडकी बाजारातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक स्तंभाचे नूतनीकरणाच्या स्तंभाचे उदघाटन खडकी कॅन्टोमेंटन बोर्डाचे उपाध्यक्ष अभय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खडकीतील सर्व धर्मातील पदाधिकारी,सभासद तसेच सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती. हा स्तंभ उभारण्यासाठी खडकीतील अखिल खडकी बौद्ध समाज कृती समिती व सम्राट अशोक प्रतिष्ठाणच्या पदाधिकारी, सभासद तसेच इतर बौद्ध अनुयायांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मा. उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, मा. नगरसेवक कमलेश चासकर, मा. नगरसेवक अँड. सौ. संगीता गवळी, अँड. अजर अली देखाणी, मा. उपाध्यक्ष माऊली यादव, मा. उपाध्यक्ष व माजी न्यायाधीश रोहिदास गायकवाड, आरपीआयचे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र परशुराम वाडेकर, व इतर मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल खडकी बौद्ध समाज कृती समिती व सम्राट अशोक प्रतिष्ठाणचे सभासद भास्कर भिंगारे, नितीन सरोदे, श्रीधर चव्हाण, मोहन प्रताप, प्रवीण गायकवाड अजय कांबळे, अविनाश सरोदे संदीप तायडे, गोपाळ वाघमारे, योगेश देठे विजय दिवेकर, माया तांबे, राज जगताप, अशोक शिंदे, मधुकर गायकवाड, युनुस शेख संजय शिंदे,इत्यादी सभासदांनी कष्ट घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button