Uncategorized

सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम संस्थेतील १० वी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार मराठी अभिनेता शरद जाधव यांच्या हस्ते

पुणे : दि. २३. दापोडी येथील सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम संस्थेतील १० वी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार मराठी अभिनेता शरद जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. पुण्यातील थंडर क्रिकेट क्लबच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त या कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेता शरद जाधव यांनी मुलांनी मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस व उदंड आयुष्यास शुभेच्छा दिल्या आहे. याप्रसंगी श्रीयुत देविदास सुरवसे यांनी संस्थेची माहिती देताना हि संस्था गेली तीस वर्ष अनाथ निराधार बालकांच्या संगोपनाचे तसेच हि संस्था सामाजिक कार्य हि करीत असून संस्था विना अनुदान तत्त्वावर काम करीत आहे. या संस्थेतुन १५० ते २०२२ विद्यार्थी शिक्षण घेऊन यशस्वी झाले आहे. पुण्यातील येथील थंडर क्रिकेट क्लब यांच्या वतीने सरस्वती अनाथ शिक्षण आश्रमास मदत करण्यात आली आहे. या कार्यक्रमास सरस्वती अनाथ शिक्षण आश्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, देविदास सुरवसे , संस्थेच्या सदस्या छबुबाई सुरवसे, थंडर क्रिकेट क्लबचे सर्व पदाधिकारी व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच संस्थेचे शिक्षक महादेव गायकवाड यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button