दलित पॅंथरच्या ५३ व्या वर्धापन दिना निमित्त पुरस्कार व पद नियुक्ती
दलित पॅंथरच्या ५३ व्या वर्धापन दिना निमित्त पुरस्कार व पद नियुक्ती

पुणे : दि. १०. दलित पॅंथर ही बौद्ध-दलित समाजहित या तत्त्वावर आधारलेल्या संघटनेची स्थापना १९७२ झाली. या संस्थेचे प्रबोधन व सामाजिक विचारांचा गाभा आहे. दलित पॅंथर लोकशाही मध्यवर्तित्व’ हे संघटनेचे प्रमुख तत्त्व उराशी बाळगून जात, धर्म, वर्ण-विरहित, शोषणमुक्त, सुखी, समृद्ध, सुसंस्कृत, विज्ञानी व समाज निर्मितीचे पायाभूत उद्दिष्ट समोर ठेवून काम करीत आहे. हि संस्था प्रामुख्याने मागास, कष्टकरी, कामगार, भूमिहीन, शेतमजूर, गरीब शेतकरी, भटक्या जाति-जमाती, आदिवासी इत्यादी या घटकांना घेऊन सामाजिक लढा लढण्यासाठी अग्रेसर असणारी संघटना म्हणून देशात ओळखली जाते. या दलित पॅंथरच्या चा ५३ वा वर्धापन दिना निमित्त महाराष्ट्रातील व पुण्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा पुरस्कार देववून गौरव करण्यात आला आहे. तसेच यावेळी काही कर्यकत्यांची पद नियुक्ती हि करण्यात अली आहे. यावेळी आहे.आंबेडकरी चळवळीतील पुण्यातील युवाकांचे नेतृत्व करणारे बोपोडीतील आशुतोष रवींद्र येरेल्लू यांची दलित पॅंथरच्या पुणे शहर कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली यावेळी महाराष्ट्रा राज्याचे उड्डाण मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम, साजन बेंद्रे व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.