औ. प्र. संस्था घोडेगाव (ता. आंबेगाव) व ता. जुन्नर येथे बस सेवा सुरु
शासकीय सदस्य अश्विनी टेमकर, डॉ. गोविंद मोघाची गारे, यांच्या प्रयत्नांना यश

पुणे : दि. १८ पुण्यातील घोडेगाव (ता. आंबेगाव) व ता. जुन्नर या ठिकाणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असल्याने विध्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेत नाही. तसेच पालकही आपल्या पाल्याला या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रेवेश घेऊ देत नव्हते. कारण हा दुर्गम भागा असून हा भाग जंगलाचा असल्याने या परिसरात बीबीट्याचा सतत मोठ्या प्रमाणात वावरत असतात. त्यामुळे विध्यार्थ्यांना या संस्थेत येता जाता भीती निर्माण होत होती. यामुळे या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थी संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. या औद्योगिक प्रशिक्षण ससंस्थेत जास्ती जास्त विध्यार्थी यावेत व नवीन विध्यार्थी यावेत यासाठी शासकीय सदस्य अश्विनी टेमकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे डॉ. गोविंद मोघाची गारे यांनी परिवहन महामंडळ महाराष्ट्र व महाराष्ट्राचे कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी सतत पाठपुरवठा करीत होते. या पात्र व्यवहारामुळे मंत्री व परिवहन विभागातील अधिकारी यांनी पुण्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे बैठक घेण्यात आली. या बठकीत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी परिवहन महामंडळ महाराष्ट्र व पुण्याचे जिल्हाधिकारी यांना घोडेगाव (ता. आंबेगाव) व ता. जुन्नर येथे बस सेवा सुरु करावी असे पत्र दिले आहे,
या पत्रात घोडेगाव (ता. आंबेगाव) व ता. जुन्नर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी सकाळी ९ वाजता घोडेगाव ते औ. प्र. संस्था घोडेगाव पर्यंत . तसेच सायंकाळी ५ वाजता औ. प्र. संस्था घोडेगाव ते घोडेगाव पर्यंत बस फेरी सुरु करावी . असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांसाठी सकाळी ९ वाजता ता. जुन्नर ते औ. प्र. संस्था माणिकडोह पर्यंत. तसेच सायंकाळी ५ वाजता जुन्नर औ. प्र. संस्था माणिकडोह ते जुन्नर पर्यंत बस फेरी सुरु करावी . यावेळी महाराष्ट्राच्या कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, शासकीय सदस्य अश्विनी टेमकर, डॉ. गोविंद मोघाची गारे, शासकीय अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.