चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश माध्यम शाळेत रंगला कलात्मक अविष्काराचे दर्शन

पुणे : दि. २६. खडकी शिक्षण संस्थेचे चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश माध्यम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यामध्ये कलात्मक आविष्कार दर्शन या कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमा विषयी मार्गदर्शन करताना शाळेचे पर्यवेक्षक गिरीश ननावरे म्हणाले, कि कला हि जीवन आहे. आणि कलात्मक जीवनाचा आनंद खरोखरच लहानांपसुते वयोवृद्धा पर्यंत सर्वानी घेतला पाहिजे . उदा. परिसरातील वेगवेगळे खेळ, तुम्ही खेळतात तशीच ही कला शिकली पाहिजे. हा कलात्मक कार्यक्रम पाहताना सर्व विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. या कार्यक्रमात राजस्थानचे रमेश राय यांनी वेगवेगळ्या रंगबिरंगी कागदांच्याद्वारे तिरंगा झेंडा, सुंदर फुलं, बहुरंगी सुंदर माळ, बाहुली,फ्लावर पॉट मधील फुले बनवून दाखवली. या कलात्मक अविष्काराचे दर्शन पाहून शाळेतील शिक्षक व विद्यार्थी भारावऊन गेले होते. या कार्यक्रमास चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश माध्यम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापिका सरिता नायर, उपमुख्यध्यापिका हेना शहा, पर्यवेक्षक गिरीश ननावरे, सर्व शिक्षक, विद्यार्थी वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.