स्वच्छता मोहीम

खडकी कॅन्टोन्मेंट स्वच्छतेमध्ये देशात ५ वा नंबर

पुणे : दि. १८. भरात सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने देश भरातील कॅन्टोन्मेंट भागांत पाचवा क्रमांक मिळवला आहे. हि खडकीतील नागरिकांकरिता अभिमानास्पद बाब आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ही स्पर्धा केंद सरकाने घेतली होती. आणि शहरातील स्वच्छतेच्या दृष्टीने ही एक मोठी मान्यता मानली जाते. याशिवाय, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला ओडीएफ++ (Open Defecation Free Plus Plus) आणि जीएफसी (Garbage Free City) प्रमाणपत्रही प्राप्त मिळाले आहे. हे प्रमाणपत्रे म्हणजे सार्वजनिक स्वच्छता गृहांची नियमित स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन,आणि घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन यावर आधारित दिली केंद्र सरकारकडून देण्यात येते. या मान्यतेमुळे खडकी कॅन्टोमेंट बोर्ड हा देशात स्वच्छतेसाठी एक मोठा आदर्श ठरत आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये ३८०० पेक्षा अधिक शहरे आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड सहभागी झाले होते. त्यामध्ये खडकी बोर्डाने अनेक उपक्रम राबवले – जसे की:

१. ओला व सुक्या कचऱ्याचे घराजवळच वर्गीकरण.

२. कचऱ्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन.

३. नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम.

४. स्वच्छतेसाठी डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली.

५. हरित आणि स्वच्छ सार्वजनिक शौचालयांची उभारणी

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. मीनाक्षी लोहिया यांनी सांगितले की, “हे यश नागरिकांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले आहे. आम्ही ओडीएफ++ आणि जीएफसी प्रमाणपत्र मिळवले असून, स्वच्छतेची गुणवत्ता आणखी वाढवण्यासाठी सातत्याने काम करत राहील. यास्वच्छ सर्वेक्षणात सहभागी शहरांतील नागरिकांचे अभिप्राय, थेट निरीक्षण आणि स्वच्छतेच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या आधारे गुण दिले जातात. या सर्व निकषांमध्ये खडकीने उजवा ठसा उमटवला आहे. खडकीच्या या यशामुळे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डा प्रशासन, अधिकारी, कर्मचारी ते आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. आणि इतर शहररानी अशाच प्रकारची प्रेरणा घेऊन स्वच्छ भारताच्या दिशेने पुढे पाऊल टाकतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हे यश मिळवण्यासाठी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. मीनाक्षी लोहिया यांचे मोलाचे योगदान मिळाले आहे. त्यांच्या मार्गदर्शने खाली खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य व उद्यान अधीक्षक शिरीष आर. पत्की, बोर्डातील सर्व आरोग्य निरीक्षक, सर्व मुकादम, अभियांत्रिकी विभागाचे सर्व अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांचे अतुलनीय योगदान मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button