सामाजिक
खडकीत साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या ५६ व्या स्मृतिदिना निमित्त आदरांजली

पुणे : दि. १९. खडकीतील महात्मा गांधी चौकात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा ५६ वा स्मृतिदिना निमित्त राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने आदरांजली वाहाण्यात आली. यावेळी आंतरराष्ट्रीय धावपटू सचिन शिराळे तसेच राष्ट्रीय मुष्टियोद्धा खेळाडू नरेश लखन यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. करण यावेळी खडकीतील यावेळी खडकीतील राजकीय पक्षातील तसेच विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडू उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन खडकी विभागातील काँग्रेसचे मा. अध्यक्ष सेलवराज अँथोनी यांनी केले होते. यावेळी अखिल खडकी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष मंगेश आवळे, पिल्ले, तसेच राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.