ऑटोनोमी महाविद्यालयांची जबाबदारी वाढली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मा. कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ”

पुणे : दि. २५. खडकी येथील तुकाराम जगन्नाथ महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी २०२०) हे भारतीय शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदल घडवणारे असून ऐतिहासिक पाऊल आहे. ऑटोनोमी असलेल्या महाविद्यालयांची भूमिका या नव्या पर्वात अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांनी केले.
खडकी येथील टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय हे ऑटोनोमी झाल्याबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना मा. कुलगुरू डॉ. अडसूळ म्हणाले कि ऑटोनॉमी ही केवळ स्वायत्तता नसून ती जबाबदारी आहे. या अभ्यासक्रमाची रचना, मूल्यांकन, आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन यामध्ये स्वायत्त बाबत महाविद्यालयांनी पुढाकार घेतला पाहिजे. सध्या एनईपी २०२० ही शिक्षण क्षेत्रातील सर्जनशीलतेची संधी आहे. त्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी नव्या शैक्षणिक संकल्पनांकडे असलेले उत्तरदायित्व, संशोधनातील नवे प्रवाह, डिजिटल शिक्षण आणि विद्यार्थी केंद्रित शिकवणी संबंधी सखोल विवेचन केले पाहिजे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे म्हणून लाभले होते. तसेच मा. कुलगुरू डॉ. अडसूळ म्हणाले कि स्वायत्त महाविद्यालयांनी (एनईपी २०२०) च्या अंमलबजावणीत नेतृत्व करण्याची वेळ आहे. अशा या विचारांच्या मार्गदर्शनामुळे प्राध्यापकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होईल. असे ते म्हणाले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आपले अनुभव मांडले आणि महाविद्यालयाच्या गुणात्मक उत्कर्षासाठी व अंमलबजावणीसाठी संकल्प करण्याचा निश्चय केला आहे. यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. सुचिता दळवी, महादेव रोकडे, राजेंद्र लेले उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी केले.