पुण्यातील औंध येथील ब्रेमेन चौका जवळ लाईटच्या बँक्सचा शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू

पुणे : दि. १४. पुण्यातील औंध येथील ब्रेमेन चौका जवळ लाईटच्या बँक्सचा शॉक लागून विनोद चिंतामण क्षीरसागर (वय २९, रिक्षाचालक, रा. कस्तुरबा गांधी वसाहत, औंध) आणि सौरभ विजय निकाळजे वय २७, नोकरदार, रा. कोथरूड या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या मृत्यूने शहरात अशा प्रकारे उघड्या व धोकादायक विद्युत यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
पोलीससूत्रानुसार औंध येथील ब्रेमेन चौकातीळ सार्वजनिक शौचालयाजवळील व एम. एस. ई. बी डीपीच्या संपर्कात आल्याने या दोघांना जोरदार शॉक बसल्याचे सांगितले जात आहे. १३ जुलै रोजी रात्री विनोद घरी न आल्यानेविनोदच्या आईने चतु:श्रृंगी पोलीसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ब्रेमेन चौका जवळील एम. एस. ई. बीच्या डीपीजवळ दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे पोलिसांना कळल्याने पोलीसांनी घटना स्थळी धाव घेत. एम. एस. ई. बीच्या कामगारांच्या मदतीने वीजपुरवठा बंद करून मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस सुरू आहे.