पुण्यातील इंटॅक्ट ऑटोमेशन वाव फाउंडेशन, धन एक्सपर्ट आणि ओएसिस काऊन्सेंलर्स फाउंडेशनच्या वतीने मृत्युंजय एज्युकेशन सोसायच्या विद्यार्थ्यांना शाळेयी साहित्याचे वाटप
सांगवीतील मृत्युंजय एज्युकेशन सोसायटी

पुणे : दि. १५. पुण्यातील इंटॅक्ट ऑटोमेशन वाव फाउंडेशन, धन एक्सपर्ट आणि ओएसिस काऊन्सेंलर्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सांगवीतील मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना शालेयी साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेतील अनेक गरजू विद्यार्थ्यांना राजेश सिंह, सौ. किरण सिंह, संगीता रायचौधरी, जिनल पोन्नाडिया, सोनी बरूआ, सुशांत गडांकुश,आकाश बोकाडे, डॉ. राजेंद्र मोरे यांच्या शुभहस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या शालेयी साहित्यामध्ये विध्यार्थाना वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, दप्तर आदी शालेय उपयोगी साहित्याचा समावेश होता. हे शालयीं साहित्य मिळाळ्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरच आनंद ओसंडून वाहत होता. या उपक्रमाद्वारे विद्याथ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होण्यास मदत होणार असून, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या साधनांची पूर्तता होणार आहे. हा कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यसाठी इंटॅक्ट ऑटोमेशन, वॉव फाउंडेशन, धन एक्सपर्ट व ओअँसिस काऊन्सेलर्स फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक सहभाग देणाऱ्या संस्थांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी शाळेच्या मा. मुख्याध्यापिका प्रमिला जाधव, यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करून या सर्व संस्थेचे आभार मानले. या साहित्य वाटपाचे नियोजन सविता लबडे व सुप्रिया मोरे यांनी केले होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रल्हाद झरांडे यांनी केले.