भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गोरेगाव पूर्व मुंबई पोलीसांच्या वतीने ध्वजारोहण व अमर जवान स्मारकास सलामी


मुंबई : दि. १९. १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गोरेगाव पूर्व मुंबई पोलीसांच्या वतीने अमर जवान स्मारकास श्रद्धांजली वाहून सलामी देण्यात आली. भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वनराई पोलीस स्टेशन येथे नुकतीच बदली झालेले खडकी येथील कर्तव्यदक्ष पोलीस इन्स्पेक्टर विकास जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच गोरेगाव पूर्व मुंबई येथील पोलीस तुकडीच्या वतीने, पोलीसांनी आपलं कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस जवान व पोलीस अधिकारी यांना श्रद्धांजली वाहून सलामी देण्यात आली.

पोलीस इन्स्पेक्टर विकास जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर पोलीस तुकडीस उद्देशून बोलताना जाधव म्हणाले कि १५ ऑगस्ट हा दिवस आपल्या देशाचा शोर्य व बलिदान आणि ऐक्याच्या अभिमानाने साजरा करण्याचा हा शुभ दिवस आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी देशातील असंख्य देशभक्तांनी व वीर क्रांतीकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे ऋण आपण कधीही फेडू शकणार नाही. आपल्याला मिळवलेले हे स्वतंत्र हे केवळ भेट नाही तर जबाबदारी आहे. भारत देशाची प्रगती, एकता आणि सन्मान जपण्याची तसेच देशाप्रतीसाठी आपलं कर्तव्य बजावण्याची ही वेळ आहे. यावेळी गोरेगाव पूर्व मुंबई वनराई पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस उपस्थित होते




