Uncategorized

खडकीतील टि. जे. महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्रतीक्षा साळवी मराठी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

खडकीतील टि. जे. महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्रतीक्षा साळवी मराठी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

खडकीतील टि. जे. महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्रतीक्षा साळवी मराठी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

पुणे : दि. ०२. पुणे जिल्हयातील खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा कमलाकर साळवी हिने सहायक प्राध्यापक – मराठी पदासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत १५ जून २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य स्तरावर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र सेट अधिव्याख्याता (MS SET – MAHARASHTRA STATE ELIGIBILITY TEST) या परीक्षेत यश संपादन केले. ३० ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता परीक्षा ती उत्तीर्ण झाली आहे. या तिच्या यशात टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय आणि या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. संजय चाकणे,व उपप्राचार्य, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. महादेव रोकडे तसेच “ऑल एक्झाम कट्टा” या ऑनलाइन माध्यमातून सेट-नेट परिक्षेचे मार्गदर्शक प्रा.डॉ. शिवदास मुंडे या सर्व गुरुजनांचे बहुमोल ज्ञानरूपी सहकार्य लाभले. तिने संपादन केलेल्या यशासाठी या सर्व शिक्षकांनी तिचे कौतुकास्पद अभिनंदन करून तिच्याबद्दलचा अभिमान व्यक्त केला आहे.

कु. प्रतीक्षा साळवी ही पुणे शहरातील गणेशनगर येरवडा येथील कृष्णाबाई गायकवाड यांची नात व उज्वला साळवी यांची मुलगी. तिने टिकाराम जगन्नाथ महाविद्यातून मराठी विभागात मराठी विषयात सर्वोत्तम प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन २०२२ साली बी.ए. ही पदवी संपादन केली.आणि २०२४ रोजी मॉर्डन महाविद्यालय शिवाजीनगर पुणे येथून एम. ए. ही पदवी प्राप्त केली. मधल्या काळात Hotel Management, MTTC- Montossory teacher training Course अशा अनेक पदव्याही संपादन केल्या आहेत. त्याचबरोबर तिने Cambridge Montessori preschool, The learning curve Preschool अशा अनेक इंग्रजी माध्यमांच्या पूर्वप्राथमिक शाळांमध्ये एक आदर्श शिक्षिका म्हणून काम केले आहे. सध्या Lexicon kids Kharadi येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मराठी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेतलेली आणि मराठी भाषेची अभ्यासक असणारी विद्यार्थिनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये एक आदर्श शिक्षिका म्हणून कार्यरत आहे ही तिच्याबद्दलची आणखी एक वाखण्याजोगी कौतुकास्पद आणि अभिमानाची बाब आहे.

या पुढील तिचा शैक्षणिक प्रवास मराठी विषयातून युजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन फेलोशिप मिळून पीएचडी पदवी संपादन करणे असा आहे. नोकरी-प्रतिकुल परिस्थिती या सर्वांचा समन्वय साधून शिक्षणा विषयीची जिद्द,आकांक्षा, धडपड पाहून तिच्या या शैक्षणिक उन्नतीबद्दल सर्व कुटुंबीय,गुरुजन, नातेवाईक, मित्रमंडळी, समाज परिवार यांच्याकडून तिचे अभिनंदनपर कौतुक होत असून तिच्याबद्दल अभिमान व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button