खडकीतील कर्नल भगत शाळा तंबाखूमुक्त, पालकांकडून अभिनंदनाचा वर्षाव

खडकीतील कर्नल भगत शाळा तंबाखूमुक्त, पालकांकडून अभिनंदनाचा वर्षाव
पुणे : दि. १३. खडकी शहरातील शैक्षणिक संस्था आणि त्यांचा परिसर तंबाखूमुक्त व्हावेत, यासाठी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्नल भगत इंग्लिश शाळेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शाळेने तंबाखू मुक्त अभियान सुरू केले आहे.यानुसार १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे कोणतेही दुकान टपरी नाही . कायद्यानूसार कलम ६ अन्वये येथे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे संपूर्ण प्रतिबंध करण्यात आले आहे.
शिवाय कर्नल भगत इंग्लिश शाळेने परिसरातील टपरी दुकानदारांना शाळेने तयार केलेल्या व्यवस्थापन समितीच्या वतीने तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे गुन्हा आहे.अशी नोटीस संबंधित राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शाळेने नोटीस काढून शाळेच्या परिसरातील तंबाखूमुक्त शाळा हे अभियान राबवण्यात आले आहे. कोटपा (COTPA) नियमानुसार म्हणजे सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा वितरण यांचे नियमन) कायदा, २००३ चा कायदा सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, व्यापार, आणि विक्रीवर नियंत्रण ठेवतो. या कायद्याची मुख्य उद्दिष्ट्ये म्हणजे तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घालणे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई करणे, आणि१८ वर्षांखालील व्यक्तींना तंबाखूची विक्री रोखणे. या पासून प्रतिबंध करित आहे.
या नियमांचे पालन करावे यासाठी पालकांनी अभियानात सहभागी होऊन सहकार्य करावे अशी इच्छा शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल सोरटे यांनी बोलताना व्यक्त केली आहे. या अभियानात शाळेच्या समितीने शाळेत तंबाखू सेवनास बंदी असल्याची नोटीस काढून त्याचा प्रसार-प्रचार सुरू केला आहे.
शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी, पालक, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांना याबाबत माहिती देण्यासाठी व्यवस्थापन समितीने, शाळेच्या गेटवर नोटिस लावली आहे, शाळेत तंबाखू नियंत्रण समितीची स्थापना केली आहे; तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थेच्या निकषाबाबत आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.शाळेच्या परिसरात धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे गुन्हा आहे, असे फलक शाळेत महत्त्वाच्या ठिकाणी लावले आहे. तंबाखूचे दुष्परिणाम व तंबाखू नियंत्रण कायदा काय आहे, याची माहिती देण्यासाठी शाळेत फलक लावून तंबाखूमुक्त शाळा यावर विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्र, पथनाट्य, निबंध स्पर्धा शाळेत आयोजित करण्यात आल्या आहे. शहरातील इतर शाळांनी या सूचनांची अंमलबजावणी करून त्यानुसार कार्यवाही करणे पालकांना वाटते या सूचना शाळेतील विद्यार्थ्यांना पालकांना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.असे स्पष्ट आदेश शाळा प्रशासनाने दिले आहे.
‘तंबाखूमुक्त शाळा’चा फलक गेटवर लावला आहे.
शाळेने तंबाखूचे दुष्परिणाम, आजाराचे लक्षणे या विषयांवर व्यवस्थापन समितीने आरोग्याची काळजी या संदर्भात दुकानदारांना चांगली माहिती दिली. हे निकष पूर्ण झाल्यानंतर शाळेच्या शंभर यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे, या संदर्भात शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ‘तंबाखूमुक्त शाळा’ असा फलक लावण्यात आला. तसेच शाळा तंबाखूमुक्त असल्याचे घोषित करण्यात आले.



