Uncategorized
रेंजहिल्स मार्केट येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा अर्धकृती पुतळा उभारण्या बाबत

रेंजहिल्स मार्केट येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा अर्धकृती पुतळा उभारण्या बाबत बोर्डाला निवेदन
पुणे : दि. ३०. खडकी रेंजहिल्स मार्केट येथे लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात यावा. या करीता खडकीतील एका शिष्टमंडळाने खडकी कॅन्टोमेंट बोर्डा मधील जॉईंट सी. ई. ओ. सुमन सौरभ यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. तसेच येणाऱ्या बोर्ड मीटिंगमध्ये याविषयावर ठराव घेऊन यावर योग्य तो मार्ग काढण्यात येईल असेही खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील जॉईंट सी.ई.ओ सुमन सौरभ यांनी आश्वासन दिले आहे. यावेळी खडकीतील ज्येष्ठ कार्यकर्ता विकास सातारकर, प्रशांत केंजळे, अभिजित गडाअंकुश, राहुल अवचित, सुशील अवचित, विशाल ओव्हाळ, प्रवीण तायडे व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते



