खडकी शिक्षण संस्थेच्या टि. जे. महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती

खडकी शिक्षण संस्थेच्या टि. जे. महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती
पुणे : दि. १६. खडकी येथील खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने कृष्णकुमार गोयल यांनी (के. के. जी. – के. आर. सी.) ज्ञान स्त्रोत केंद्रात प्रेरणादायी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, संस्थेचे सहसचिव व प्राचार्य डॉ. संजय चाकणे, सचिव आनंद छाजेड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे गोयल यांनी विध्यार्थी व प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती पासून विद्यार्थी दूर चालले आहेत. यावरती चिंतन करणे खूप गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी वाचनाची गोडी वाढवली, विचारांची खोली निर्माण केली, तर हाच ग्रंथप्रदर्शनाचा कार्यक्रम हा खऱ्या अर्थाने यशाचा क्षण ठरेल.असे मत व्यक्त केले व उपस्थितांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये “डॉ.अब्दुल कलाम यांच्या कार्याचा आढावा घेताना ‘वाचनातून विचार आणि विचारातून कृती’ या संदेशाने प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचा विकास साधावा. ग्रंथ हेच ज्ञानाचे खरे गुरू आहेत; आणि त्यांच्याशी नाते दृढ झाले, तर व्यक्तिमत्त्वाचा विकास आपोआप होतो.” प्रेरणादायी ग्रंथप्रदर्शनाच्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, चिंतनशीलतेची भावना आणि ज्ञानसंस्काराची नवी उर्मी जागवली पाहिजे.वाचन संस्कृतीचा प्रसार म्हणजेच डॉ. कलाम यांच्या स्वप्नातील “ज्ञानमय भारत” साकार करण्याचा प्रयत्न करा. वाचन संस्कृतीचा प्रसार म्हणजेच डॉ. कलाम यांच्या स्वप्नातील “ज्ञानमय भारत” साकार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अध्यक्ष गोयल विध्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा देतात.तो संदेश प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी संस्थेचे सचिव आनंद छाजेड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथापाल डॉ. आनंद नाईक यांनी केले तर आभार डॉ. शैलेंद्र काळे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव रोकडे, डॉ. सुचेता दळवी, प्रा. राजेंद्र लेले, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. जे. डी. नाईक, लिपिक योगिता चव्हाण, सेवक सुरेश सोलंकी, बाबा गायकवाड उपस्थित होते तसेच शिक्षक व शिक्षेकेरत कर्मचारी व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




