पिंपरी चिंचवड वाल्हेकरवाडीत नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवड वाल्हेकरवाडीत नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

पुणें : दि. १०. पिंपरी चिंचवड वाल्हेकरवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक वाल्हेकरवाडी दिनांक २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोंबर २०२५ या दरम्यान भव्य नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भरत वाल्हेकर व सुप्रिया वाल्हेकर यांनी गेल्या १२ दिवसात या कार्यक्रमाचे उत्कृष्ट अयोजन करून प्रभाग क्रमांक १७ मधील महिलांना व तरुणांना नवरात्र महोत्सवानिमित्त भव्य रास दांडिया खेळण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिले होते. यावेळी रास दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. स्पर्धेतील विजेत्यांना ३ ई – बाईक तसेच उत्तेजनार्थ बक्षीसे व हजारो महिला स्पर्धकांना साडी व भेट वाटू देण्यात आली. या नवरात्र महोत्सवात १एकूण १ लाख ११ हजार १११ रुपयाचे पारितोषिक हजारो लोकांच्या उपस्थितीत देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक भरत वाल्हेकर व सुप्रिया भरत वाल्हेकर यांनी केले होते. यावेळी श्री व सौ वाल्हेकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भरत वाल्हेकर यांनी त्यांच्या भाषणात लोकांना उद्देशून म्हणाले की मी सदैव तुमच्या सेवेकरिता तत्पर राहील. असे आश्वासन त्यांनी दिले आहेत. या नवरात्र उत्सव व बक्षीस वितरण समारंभात येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचे बिबुल वाजल्याचेहि जाणवले असल्याचे चित्र दिसले असून प्रभाग क्रमांक १७ चा विचार केला असता या १२ दिवसाच्या वरात्र महोत्सवामुळे परिसरातील विरोधकांची झोप उडाल्याचे चित्र दिसले आहे. नवरात्र महोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीना गुलाब वाल्हेकर, वैशाली सुनील वाल्हेकर, आकाश राजेंद्र खैरे, शुभम सुनील वाल्हेकर, यश गुलाब वाल्हेकर, चंद्रकांत दत्तोबा चिंचवडे, गुलाब शंकर वाल्हेकर, प्रजाक्ता हेमंत वाल्हेकर आणि वाल्हेकरवाडी ग्रामस्थ व प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांच्या विशेष योगदान मुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला असल्याचेही म्हटले जात आहे.





