येरवडा येथील दिव्यांग व वृद्ध नागरिकांसाठी महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात गैरसोय

येरवडा येथील दिव्यांग व वृद्ध नागरिकांसाठी महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात गैरसोय
पुणे : दि. १६. पुणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येरवडा मधील दिव्यांग व वृद्ध नागरिकांसाठी महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात गैरसोय होत असल्याचे दिसत आहे. पुण्यातील येरवडा येथील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्र, येथे महिलांसाठी व बाल संगोपनाशी संबंधित विविध योजना राबवल्या जातात. या कार्यालयात लाभ घेण्यासाठी अनेक दिव्यांग व वृद्ध नागरिक नियमितपणे भेट देत असतात. मात्र, संबंधित कार्यालयात लिफ्टची सुविधा उपलब्ध नसल्याने दिव्यांग व वृद्ध नागरिकांना वरच्या मजल्यावरील कार्यालयात जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याठिकाणी दिव्यांग व वृद्ध नागरिकांसाठी जिना चढणे व उतरणे कसरतीचे होत आहे. यामुळे या लोकांना मानसिक व शाररिक त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत पुण्यातील झुंज दिव्यांग संस्था आश्रम प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष राजु कडप्पा हिरवे यांनी याबाबचा प्रत्यक्ष अनुभव सांगितला आहे. ते म्हणाले की, मी स्वतः या कार्यालयात दुपारी बारा वाजता आलो होतो. आणि सायंकाळी चार वाजेपर्यंत थांबलो असता, या दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सुख सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांचॆ मोठी गैरसोयीचा होत आहे. या परिस्थितीची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने उद्वाहकची (लिफ्टची) सोया करण्यात यावी. अशी मागणी दिव्यांग बांधवांकडून करण्यात आली आहे.




