Uncategorized
एसआरपीएफचे वरिष्ठ पोलीस हवालदार सुनील उर्फ बापू बसवराज नाईक यांचे निधन

एसआरपीएफचे वरिष्ठ पोलीस हवालदार सुनील उर्फ बापू बसवराज नाईक यांचे निधन
पुणे : दि. २७. खडकी येथील खडकी शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक महादेव नाईक यांचे पुतणे राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) गट दोनचे वरिष्ठ पोलीस हवालदार सुनील उर्फ बापू बसवराज नाईक (वय ४२) यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, आई, फर्ग्युसन महाविदयालयाचा कर्मचारी भाऊ राहुल, पोलिस कर्मचारी बहिण ज्योती, काका, काकू असा मोठा परिवार आहे. ते सन २००६ पासून पोलीस दलात कार्यरत होते. ते खडकी येथील शिवशक्ती मित्र मंडळाचे पद हि भूषविले असून, त्यांचा सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय राहत होते.


