खडकी पोलीस स्टेशन चौकात भारतीय संविधान प्रबोधन मंचच्या वतीने संविधान चौक फलकाचे उद्घाटन

खडकी पोलीस स्टेशन चौकात भारतीय संविधान प्रबोधन मंचच्या वतीने संविधान चौक फलकाचे उद्घाटन

पुणे : दि. २१. खडकीतील भारतीय संविधान प्रबोधन मंच यांच्या वतीने खडकी पोलीस स्टेशन समोरील चौकात संविधान चौक या नाम फलकाचे उद्घाटन छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे माननीय आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते खडकीतील भारतीय संविधान प्रबोधन मंचचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांच्या उपस्थित उद्घाटन झाले. या उद्घाटन प्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे बोलतांना म्हणाले कि येणाऱ्या १४ एप्रिल २०२६ रोजी या चौकाला आमदार निधीतून भक्कम असे बांधकाम करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्यंत या चौकाचे भूमी पूजन करून या चौकाला संविधान चौक म्हणून मोठी संगमरवरी दगडात संविधान चौक नाम फलक बसविण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यांच्या सकारात्मक भूमिकेबद्दल खडकीकरांच्या वतीने आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. यावेळी विजय जगताप यांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या कामाबद्दल कौतुक केले आहे. यावेळी भारतीय संविधान प्रबोधन मंचच्या वतीने घोषणा देण्यात आल्या संविधानाचा सन्मान, खडकीचा अभिमान!” या संविधान चौकातील फलकाच्या उद्घाटन प्रसंगी खडकी कॅन्टोमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अभय सावंत, माजी उपाध्यक्षा व मा. नगरसेविका कार्तिकी हिवरकर, उपाध्यक्ष व मा. नगरसेविक मा. दुर्योधन भापकर, पुणे महानगर पालिकेचे मा. नगरसेवक आनंद छाजेड, मा. नगरसेवक कमलेश चासकर, भारतीय संविधान प्रबोधन मंचाचे पदाधिकारी नितीन सरोदे, बिनगर भास्कर, गोपाळ वाघमारे, भारत ठाकूर, राकेश पिल्ले, प्रवीण गायकवाड. माया तांबे, विजय दिवेकर, मोहन प्रताप, रुपाली (राणी) बाराथे तसेच भारतीय संविधान प्रबोधन मंचाचे सर्व पदाधिकारी व सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.




