पिंपरीत दि, बुध्दिस्ट विकास फाऊंडेशनच्या वतीने बुद्धभुषण पुरस्काराचे वितरण

पिंपरीत दि, बुध्दिस्ट विकास फाऊंडेशनच्या वतीने बुद्धभुषण पुरस्काराचे वितरण
पुणे : दि. ०९.देशात आणि राज्यात घटना विरोधी वातावरण चालू आहे, विकासात सध्या जात हि अडथळा निर्माण करते, धर्मांत जातीवादी शक्ती सनातनी गोटातून घटना विरोधी कारवाया करते, त्यामुळे आंबेडकरवादी समाजाने घटना विरोधात बोलणाऱ्याचे षडयंत्र ओळखण्याची काळाची गरज आहे. फुले शाहू आंबेडकर आण्णाभाऊ साठे यांनी जाती अंताचा लढा उभारला त्यांना जात नको होती, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जात म्हणून तत्कालीन व्यवस्थेने नाकारला, अर्थीक संपत्तीचं राष्ट्रीकरण झाले पाहिजे तरच देशाचा विकास होईल.आदिवासी समाज बांधवांना दर्या खोऱ्यात राहणाऱ्या नागरिकांना घटनेत आरक्षण दिले, सामाजिक शैक्षणिक मागासलेपणा घालवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत तरतूद केली म्हणून वंचित घटकांचा विकास झाला.पुरुषा बरोबर महिलांना आरक्षण दिले आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाबरोबर काम करताना दिसतात.सार्वजनिक जिवनात विकासाला अडथळा निर्माण करणारी जात नष्ट करण्याची काळाची गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा सुकुमार कांबळे यांनी यावेळी केले. पिंपरीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात दि, बुध्दिस्ट विकास फाउंडेशनने आयोजित केलेल्या संविधान गौरव दिनाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले ,छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी संविधान प्रस्थाविकेचे सामुदायिक वाचन केले.यावेळी देवेंद्र तायडे,बाबा कांबळे, अजिज शेख यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.यावेळी जेष्ठ विचारवंत प्रा सुकुमार कांबळे,जेष्ठ गायक साजन बेंद्रे यांना बुद्धभुषण पुरस्कार, आंबेडकरी गायक संकल्प गोळे डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार, प्रशिक(मुन्ना) भालेराव , विनोद चांदमारे, कलिंदर शेख, विजय भुजबळ, रमेश ब्रम्हा,धिरज वानखेडे यांना संविधान रत्न सन्मान पुरस्कार, देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक यशवंत मानकर, युवा नेते सिद्धार्थ बनसोडे, चंद्रकांत बोचकुरे, ॲड वाजेद खान बिडकर, यांच्या सह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते. या कार्येक्रमाचे प्रस्ताविक सामाजिक कार्यकर्ते राजन नायर यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारदस्त आवाजाने प्रा भास्कर तिकटे यांनी केले ,आभारप्रदर्शन आयोजक शिवाजीराव झोडगे यांनी मानले.




