Uncategorized

बोपोडी मध्ये हळदी कुंकू निमित्त “सन्मान नारी शक्तीचा, खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

बोपोडी मध्ये हळदी कुंकू निमित्त “सन्मान नारी शक्तीचा, खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

हळदी कुंकू हा हिंदू संस्कृतीचे जपणूक करणारा समारंभ आहे याच उद्देशाने संत तुकाराम महाराज दिंडी सोहळा व लोकमत सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने बोपोडी विठ्ठल रुक्मिणी हॉल येथे हळदी-कुंकू व खेळ पैठणीचा मोठ्या उत्साहात व सौ. मृणाल सनी निम्हन, सौ. भक्ती गायकवाड, सौ. सुनीता वाडेकर, सौ. सपना छाजेड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

हळदी-कुंकूवा मागील धारणा अशी आहे की, प्रत्येक सुवासिनी ही साक्षात आदिशक्तीचे प्रतीक आहे. त्यांना हळद-कुंकू लावताना आपण त्यांच्या माध्यमातून देवीचे तत्त्व जागृत करतो. यामुळे केवळ आध्यात्मिकच नाही, तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते. या सोहळ्यामध्ये सुवासिनींना वाण देणे, उखाणे, गाणी, खेळ आणि गोडधोड पदार्थांचा आनंद घेतात.

हळदी कुंकू समारंभ हा हिंदू संस्कृतीचे जपणूक करणारा समारंभ आहे. या समारंभाच्या माध्यमातून महिला एकत्र येतात, हळदी कुंकू करतात, वाण लुटतात त्यामुळे त्यांची एकमेकींशी ओळख होते आणि स्नेह वाढतो. माणूसच माणसाच्या मदतीला धावून येतो. या झालेल्या ओळखीतून महिला एकमेकींना अडचणीत मदत करून पुढे जाऊ शकतात.

आपणास काही अडचण जाणवली, समस्या जाणवली तर आवाज द्या मी नक्की तुमच्या अडचणी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल असे सौ. भक्ति गायकवाड यावेळी म्हणाल्या .

कार्यक्रमाचे आयोजन श्री. सदाशिव मोरे, श्री. स्वामी नवले, श्रीमती शांताबाई ढोरे, सौ. गायत्री चौधरी, सौ. उज्वला बहिरट, सौ. स्नेहा मोरे यांनी केले.

श्री संत तुकाराम महाराज दिंडी सोहळा व लोकमत सखी मंच बोपोडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत ‘सौभाग्याचे लेणं’ हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी श्री. राकेश बहिरट, श्री. विशाल बहिरट, श्री. तुषार बहिरट, श्री. संजय चौधरी, श्री. रमेश सुभेदार यांचे विशेष सहकार्य लाभले. या प्रसंगी सौ मंगला ज्ञानेश्वर मुरकुटे, सौ. मनिषा मोरे, सौ. अनुसया साठे, सौ. उर्मिला नवले सौ. संगीता बहिरट, सौ. सुजाता बहिरट, सौ. मेघना कालेकर यांच्यासह गावातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button