छावा संघटनेचे पुणे जिल्हा प्रमुख व पत्रकार उत्कर्ष समितीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष राम जाधव यांचे निधन

खडकीतील सामाजिक कार्यकर्ता आणि छावा संघटनेचे पुणे जिल्हा प्रमुख व पत्रकार उत्कर्ष समितीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष राम जाधव यांचे हृदय विकाराने निधन
पुणे : दि. ०५. खडकीतील सर्वांचे लाडके सामाजिक कार्यकर्ता आणि छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख राम जाधव यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी सांगवी येथे हृदयाच्या धक्याने दुःखद निधन झाले. कै राम जाधव हे खडकी, बोपोडी औंध रेंजहिल्स व सांगावी परीसरातील एक सामाजिक व राजकीय चळवळीतील एक महान व्यक्ती हरवला.

राम दुलबाजी जाधव यांच्या दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी ममता नगर सांगावी येथे रात्री ८:१५ वाजता हृदय विकाराने निधन झाले. राम जाधव हे छावा संघटनेचे पुणे जिल्ह्या प्रमुख होते. तसेच ते पत्रकार उत्कर्ष समितीचे महाराष्ट्र उपाधयक्ष होते. राम जाधव हे इतर संघटनांच्या माध्यमातून तसेच असंघटित कामगार, नागरिकांच्या हक्कांसाठी लढणारे लढवया व मनमिळावू कार्यकर्ता हरपल्याने सर्वत्र दुःखाचे सावंत पसरले आहे. राम जाधव हे महाराष्ट्राचे कुल दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज तसचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन छावा संघटनेच्या चळवळीतून काम करीत होते. त्यांच्या निधनाने खडकी, बोपोडी, दापोडी, औंध, रेंजहिल्स व सांगावी परीसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी निशा, मुलगा प्रथमेश व मुलगी शिवानी तसेच सून, भाऊ व भावजय असा मोठा मित्र परिवार आहे.



