Uncategorized

उपमुख्यमंत्रीअजित पवार यांचा हा निव्वळ अपघात, यात राजकारण नाही – शरद पवार

 

पुणे; दि. 29 (शशिकांत पाटोळे) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज विमान अपघातात निधन झालं आहे. या घटनेवर अजित पवार यांचे काका तथा महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच कधीही न भरुन निघणारं असं नुकसान या घटनेमुळे झालं आहे. तसेच हा निव्वळ अपघात आहे. यात राजकारण नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. शरद पवार यावेळी खूप भावूक झालेले बघायला मिळाले. त्यांना बोलता देखील येत नव्हतं. तसेच आपण आज मीडियासमोर येणार नव्हतो, असंही शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया देताना नमूद केलं.

*शरद पवार काय म्हणाले?*

“महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. महाराष्ट्राला हा प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्वान नेत्याला महाराष्ट्र आज मुकला आहे. हे जे नुकसान झालं ते भरुन निघणारं नाही. मी आज मीडियासमोर येणार नव्हतो. पण काही जणांनी या अपघातामागे काही तरी राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका घेतली. याच्यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला आणि आम्हा सर्वांना होत आहेत. कृपा करुन इथे राजकारण नाही एवढंच सांगायचं आहे”, असं शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दुर्घटनेची माहिती मिळाल्यापासून अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांना मानणाऱ्या नागरिकांचा कालपासून बारामतीत मोठा जनसागर लोटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेच्या आदल्या दिवशी अजित पवारांच्या चालकाने त्यांना रात्रीच गाडीने पुण्याला जाऊ असं म्हटलं होतं. पण अजित पवारांनी ते ऐकलं नाही. आणि आज मी माझं सर्वस्व गमावल्याची भावना चालक शामराव नारायण मनवे यांनी व्यक्त केल्या आहेत.

रात्रीच गाडीने पुण्याला जाऊ म्हणालो; पण दादांनी ऐकलं नाही

चालकांनी याबाबत एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, मुंबईतील दादांच्या मीटिंग्स रात्री लवकरच संपल्या होत्या त्यामुळे आम्ही दादांना आपण रात्रीच कारणे बारामतीला जाऊ असे म्हणालो होतो. पण दादांच्या पुढे कोण जाणार? दादा मला म्हणाले, तू पुण्याला ये, मी सभा आटोपून पुण्याला येतो; मात्र बुधवारी सकाळीच हे दुर्दैवी घटना घडली. आता माझं आयुष्यच थांबलो आहे. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चालक शामराव नारायण मनवे वय 71 यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button