पुण्यातील काळेवाडी येथील सनराईज लाईफच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा

पुण्यातील सनराईज लाईफच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा

पुणे : दि. ३०. (प्रतिनिधी कप्लना अरविंद लोहोरा) – पुण्यातील काळेवाडी येथील सनराईज लाईफच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच सनराईज लाईफच्या कार्यालयात विचारांचे मंथन व सामाजिक चळवळी विषयी जनजागृती करण्यात आली. ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या याच औचित्याने ‘सनराईज लाईफ’ (Sunrise Life) च्या कार्यालयात देखील एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी केवळ औपचारिक साजरीकरण न होता, विचारांची सखोल आदान-प्रदान आणि सामाजिक जागृतीवर भर देण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर अनेक मान्यवरांनी ‘सनराईज लाईफ’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी देशाच्या आणि समाजाच्या जडणघडणीत प्रत्येकाचे योगदान काय असावे, यावर उपस्थित मान्यवरांमध्ये विचारांची आदान-प्रदान झाली. लोकशाहीची मूल्ये आणि सामाजिक कर्तव्ये तसेच या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ‘सनराईज लाईफ’ चळवळीबद्दल करण्यात आलेली जनजागृती.करण्यात आली. या चळवळीत सर्व सामान्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी ही चळवळ कार्य करीत आहे. समाजातील सर्व घटकांना या प्रवाहात सामावून घेण्याचा संस्थेचा मानस नेहमीच असतो. या कार्यक्रमाचा शेवट,एका सकारात्मक ऊर्जेने आणि राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या शुभ प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी दीपंकर कदम, राहुल गायकवाड, समद शेख, अनिल जाधव, श्रीहरी सोनकांबळे, अजय लोंढे, शोभा गायकवाड, अर्चना लगड व सभासद उपस्थित होते.


