गुरुवारी दि. ०३ एप्रिल २०२५ रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

पुणे : दि. ३१. पुणे महापालिकेकडून तातडीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी गुरुवारी (दि. ३ एप्रिल २०२५) रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेतील पाणी पुरवठा विभाच्या वतीने कळविण्यात आले आहेत. तसेच जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही पुणे महापालिकेच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. ४ एप्रिल २०२५) रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरळीत केला सुरु राहणार आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते. त्यामुळे अचानक पणे पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता टाळण्यासाठी विद्युत व पंपिंग यंत्रणेच्या तातडीच्या दुरुस्तीची कामे एकाच दिवशी करणार आहे.
पाणी पुरवठा बंद राहणार भाग पुढील प्रमाणे : होळकर जलकेंद्र, पर्वती टँकर पॉईंट, भामा आसखेड जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, नवीन पर्वती आणि जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, महादेवनगर टाकी, श्रीहरी टाकी), खडकवासला जॅकवेल, वारजे फेज १ व २, चतु:श्रुंगी टाकी परिसर, आगम मंदिर टाकी, एस.एन.डी.टी., गांधी भवन, राजीव गांधी पंपिंग कात्रज चौक परिसर (केदारेश्वर टाकी, पॅनकार्ड क्लब, कोंढवे-धावडे जलकेंद्र व रॉ वॉटर केंद्रे इत्यादी.