Uncategorized

९ ऑगस्ट हा क्रांती दिन साजरा, क्रांतिकारकांच्या क्रांतिकार्याने प्रज्वलीत झाली विद्यार्थ्यांची मने – गिरीश ननावरे  

        पुणे : दि. १३. खडकी शिक्षण संस्थेचे चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश मीडियम शाळेत ९ ऑगस्ट हा क्रांती दिन साजरा करण्यात आला. ९ ऑगस्ट १९४२ रोजी या चळवळीची सुरुवात झाली. ९ ऑगस्ट रोजी ब्रिटिश सरकारने महात्मा गांधीं यांच्यासह कॉग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन हि चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळचे काँग्रेसचे अरुणा असफ अली यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे नेतृत्व केले. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी ९ ऑगस्ट हा ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात झाल्याने याला ‘ऑगस्ट चळवळ किंवा ऑगस्ट क्रांती दिन असेम्हटले जाते. महात्मा गांधीनी त्यांच्या भाषणात देशाला संबोधताना म्हणाले कि ‘करो या मरो’ चे आवाहन केले होते. भारत देशातील ब्रिटीशांची सत्ता संपवण्याकरिता ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु करण्यात आली होती. या ऐतिहासिक क्षणांची आठवण करुन देणाऱ्या स्मारकाची उभारणीहि या मैदानावर केली गेली आहे. खडकीतील चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनि‌ कॉलेजमध्ये क्रांतीदिन व रक्षाबंधन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी बोलताना शाळेचे पर्यवेक्षक गिरीश ननावरे म्हणाले की क्रांतिकारकांनी केलेल्या कार्याचे स्मरण ठेवून, आपणही आपल्या देशासाठी महान कार्य केले पाहिजे. “क्रांती की तलवार विचारो की सान पर तेज होती है” अनुराधा आटोळे यांनी कधी पेटशील रे” व “मायबाप रक्षक” हे काव्यवाचन केले. तसेच धनश्री माने यांनी रक्षाबंधन विषयी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी क्रांतीकारकांचे गणवेश परिधान करून भाषण व देशभक्तीपर गीत गायले. यावेळ शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता नायर सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. ९ ऑगस्ट या क्रांतिदिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता भालेराव व आभार प्रदर्शन सुष्मिता चक्रवर्ती यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button