Uncategorized

“२९ ऑगस्टला” मनोज जरांगें पाटील मुंबईत, मराठा आरक्षणासाठी बैठक 

“२९ ऑगस्टला” मनोज जरांगें मुंबईत, मराठा आरक्षणासाठी बैठक

पुणे : दि. २६. मराठा आरक्षणाचा नवा अध्यादेश निघाल्यामुळे एक नवा इतिहास रचला गेला आहे. पण, हा लढा काही आताचा सुरु झालेला नाही. १९८२ साली अण्णासाहेब पाटील ते २०२४ मध्ये मनोज जरांगे पाटील असा हा मराठा आरक्षणाचा प्रवास सुरु झाला आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. येत्या २९ ऑगस्ट २०२५ रोजी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आज दुपारी १२ वाजता आंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईत केल्या जाणाऱ्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील आज महत्त्वाची भूमिका घेणार आहेत. की राज्य सरकारला पुन्हा एकदा वेळ देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. या आंदोलनासाठी गावोगाव आणि विविध जिल्ह्यात बैठका आणि गाठीभेटी घेऊन जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना मुंबईला येण्याचा आवाहन केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोठे आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. सोलापुरातून २५ हजार गाड्या मुंबईकडे रवाना होणार असलयाचे म्हटले आहे. माढा येथे झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समाजासाठी जे नेते पुढे येतील, त्यांनाच पाठिंबा देण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. गरजू मराठ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. यावेळी राज्य मराठा समन्वयक माऊली पवार यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सरकारने मराठा आंदोलनात अडथळा आणण्यासाठी हाके यांना फॉर्च्युनर गाडी आणि फ्लॅट देऊन पाठवले असा आरोप त्यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांना १० लाख रुपये कोणत्या आमदारांनी दिले, हे हाके यांनी जाहीर करावे. जरांगे पाटील यांनी कोट्यवधी मराठ्यांची मने जिंकली आहेत, त्यामुळे १०-१५ लाखांची चर्चा करून काही फायदा नाही. लोकांनी लाखो-कोटींच्या संख्येने सभेला येऊन पाठिंबा दिला आहे. हाके धनगर समाजाशीही प्रामाणिक नाहीत, त्यामुळे त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. हाके यांनी मराठ्यांवर टीका करत राहावे, आम्ही मात्र आरक्षणाची लढाई जिंकणारच, असा निर्धारही माऊली पवार यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button