पुण्यातील पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण, दैनिक पत्रकाराला जीवे मरण्याची धमकी
पत्रकारा अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी

पत्रकारा अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी खडकीतील नितीन शिंदेवर गुन्हा दाखल, पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण
पुणे : दि. २०. महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध दैनिकाच्या वृतपात्रातील पत्रकाराने खडकी कॅन्टोमेंट बोर्डातील अतिक्रमणाची बातमी प्रसिद्ध केल्याने एका पेपर विक्रेत्यांनी पत्रकाराला फोनवरून अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पेपर विक्रेत्या नितीन शिंदे (रा. दर्गा वसाहत, खडकी) यांच्या विरोधात पोलीसात पत्रकार अमोल सहारे यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलीससूत्रांनुसार पुण्यातील एका प्रसिद्ध दैनिकात पत्रकार अमोल सहारे हे काम करतात. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मीनाक्षी लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईची बातमी सहारे यांनी आपल्या प्रसिद्ध दैनिकात प्रकाशित केली होती. बातमी प्रकाशित झाल्यावर पेपर विक्रेता नितीन शिंदे यांनी ऑफिसमध्ये फोन करून अश्लील भाषेत सहारे यांच्या विषयी बदनामी केली. तसेच ऑफिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणून माफी मागण्यास भाग पाडले. अधिकार्यांनी परिषद फोन (कॉन्फरन्स कॉल) वर पेपर विक्रेता नितीन शिंदे यांच्याशी सहारे यांच्याशी बोलणी करून दिले, त्यावेळी नितीन शिंदे यांनी अमोल सहारे यांना प्रचंड अश्लील शिवीगाळ करून हात पाय तोडून जिवे मारण्याची थेट धमकी दिली. फोन वरून धमकी दिल्याने संपूर्ण संभाषण सहारे यांच्या फोन मध्ये रेकॉर्डिंग झाली आहे. फोनवरून अश्लील शिवीगाळ तसेच जीवे मारण्याच्या धमकीमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. पत्रकार अमोल सहारे यांनी भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, मा. राष्ट्रपती, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मा. एकनाथ शिंदे, तसेच पोलीस महासंचालक मुंबई, पोलीस आयुक्त सहित वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी यांना निवेदनाद्वारे दिले आहे. पत्रकार सहारे यांच्या निवेदनाची दाखल घेत विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मध्ये नितीन शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे अंमलदार कांचन जाधव व करीत आहे.




