जेष्ठ समाजसेवकांचा बोपोडी संविधान गौरव पुरस्कार सोहळा साजरा

जेष्ठ समाजसेवकांचा सन्मान करीत बोपोडीत संविधान गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
पुणे : दि. ३०. बोपोडी येथे भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या संविधानाचा गौरव तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकरणारे जेष्ठ विधीतज्ञ अँड. रमेश पवळे, अँड. नंदलाल धीवार, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक राहुल शिंदे, गायक अमर पुणेकर, युवा गायक रोहित शिंदे, पत्रकार महेंद्रकुमार कांबळे, प्राजक्ता गायकवाड, सुंदरताई ओव्हाळ, इंद्रजित भालेराव, प्रशांत टेके, आंबेडकर चळवळीचे जेष्ठ नेते मा. आमदार अँड. जयदेव गायकवाड, मा. नगरसेवक कैलास गायकवाड, आनंद छाजेड, संभाजी शिंदे, जेष्ठ बौद्धाचार्य दादासाहेब रणपिसे, भीमआर्मीचे सीताराम गंगावणे, अँड. तानाजी चोंधे, नाना वाळके, शहाजी रानवडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन लंडन यूके अध्यक्ष रवींद्र कचरे, जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, सम्राटचे पत्रकार दत्ता सूर्यवंशी, फुटबॉल पट्टू राजू गोपाळ, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भुतडा, वनवर्धिनी फाउंडेशन अध्यक्ष विजय ढोणे, फुले शाहू आंबेडकर विचार मंच अध्यक्ष विजय जाधव, एमआयएम नेते जुबेर पिरजादे, आरपीआय नेते रमेश ठोसर, धम्मबंधू रवींद्र कांबळे , टकारी समाजाचे रवींद्र गायकवाड, इत्यादींचा गौरव सन्मान पुण्यातील महाराजा अग्रसेन फाउंडेशनच्या यांच्या मा. जनसेविका रेखाताई संजय आगरवाल यांच्या हस्ते करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप भारतीय राजमुद्रा असलेली स्मुर्तिचिन्ह, शाल, श्रीफळ होते. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजक पत्रकार संजय आगरवाल म्हणाले संविधान हे आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा मध्ये तरी सर्वांना संविधानाची उद्दिष्ठ्ये आणि वैशिष्टये माहित व्हावी या उद्देशाने समाज जागृतीसाठी व संविधान गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.

