आता भारतीय टपाल विभाग पाठवणार पवित्र गंगाजल आणि देवी देवतांचा प्रसाद
टपाल विभागाचा नवीन उपक्रम.

आता भारतीय टपाल विभाग पाठवणार पवित्र गंगाजल आणि देवी देवतांचा प्रसाद”
टपाल विभागाचा नवीन उपक्रम.
पिंपरी : दि. २४. भारतीय टपाल विभागाच्या व्यवसाय वृद्धी मोहिमेअंतर्गत पुणे टपाल विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय नागरिकांना गंगेचे पवित्र जल तसेच महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा पवित्र प्रसाद घरबसल्या मागवता येणे शक्य होणार आहे.त्यासाठी भारतीय टपाल विभागाच्या पुणे परिक्षेत्राच्या वतीने व्यावसायिक करार देखील संबंधित तीर्थक्षेत्रांच्या न्यास यांचे समवेत झालेला आहे.
गंगाजल – ही सुविधा सबंध भारतातील निवडक टपाल कार्यालयामध्ये अगोदरपासूनच उपलब्ध आहे. या अंतर्गत हिमालयातील गंगा नदीचे पवित्र जल भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून भारतातील निवडक पोस्ट ऑफिस मध्ये सर्वसामान्य भारतीयांसाठी विक्रीसाठी उपलब्ध केले जात आहे.अतिशय किफायतशीर दरामध्ये अडीचशे मिली लिटर क्षमतेची बाटली पोस्ट ऑफिस मध्ये केवळ 30 रुपयांना उपलब्ध होणार आहे. हे पाणी पिण्याचे नसून धार्मिक संस्कारांसाठी पवित्र जल म्हणून वापर करण्याचे आहे. सर्वसामान्य नागरिक वैयक्तिक अडचणींमुळे किंवा शारीरिक अस्वास्थते मुळे गंगा यमुनोत्री अशा हिमालयातील पवित्र ठिकाणी भेट देऊ शकत नाहीत अशा सर्व ग्राहकांसाठी ही सुविधा खरोखरच आनंददायक व लाभदायक ठरणार आहे.
महाप्रसाद – टपाल विभागाच्या पुणे परिक्षेत्राच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचा प्रसाद देखील घरबसल्या नागरिकांना घरपोच मागवता येणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर देवस्थान, ज्ञानेश्वर माऊली देवस्थान,विघ्नहर ओझर गणपती, सातारा जिल्ह्यातील समर्थ रामदास स्वामी देवस्थान, सोलापूर जिल्ह्यातील स्वामी समर्थ मंदिर,अन्नक्षेत्र मंदिर तसेच सातारा व बारामती परीक्षेतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. तशा आशयाचा करार देखील पुणे परिक्षेत्राच्या वतीने संबंधित तीर्थक्षेत्रांच्या विश्वस्त यांचे सोबत करण्यात आलेला आहे. त्यामुळे भारतीय टपाल विभागाची सेवा फक्त टपाल सेवा किंवा पार्सल सेवा याबाबतीतच मर्यादित न राहता सर्वसामान्य जनतेच्या विश्वास पवित्रता तसेच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना या बाबतीत देखील महत्वपूर्ण ठरत आहे. तरी नागरिकांनी वरील दोन्ही सेवांचा लाभ भारतीय टपाल विभागाच्या माध्यमातून घ्यावा असे आवाहन पुणे परिक्षेत्राचे डायरेक्टर,पोस्टल सर्व्हिस, श्री अभिजीत बनसोडे यांनी केले आहे.
” नागरिकांच्या धार्मिक आस्था, भावना, विविध प्रासंगिक उपनयन प्रसंस्कार यांचा विचार करून पुणे टपाल विभागाने देखील गंगाजल व महाराष्ट्रातील निवडक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रांचा महाप्रसाद या दोन सेवा नागरिकांना घरपोच देण्या संदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आपण सर्वांनी या सेवांचा लाभ घेऊन डाक विभागाची ही सेवा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावी. ”
अभिजित बनसोडे (IPoS) इंडियन
डायरेक्टर,
पोस्टल सर्व्हिस,
पुणे विभाग.


