पिंपळे गुरव येथे प्रथमच भव्य नोकरी मिळाव्यास उसपूर्त प्रतिसाद

पिंपळे गुरव येथे प्रथमच भव्य नोकरी मिळाव्यास उसपूर्त प्रतिसाद

पुणे : २५. पिंपळे गुरव येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन सोनवणे व सौ. प्रमिता प्र. सोनवणे यांच्या वतीने दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी जवळकर नगर येथील श्रीकृष्ण मंदिर सभागृहा येथे प्रथमच भव्य नोकरी मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या नोकरी मिळाव्यास पिंपळे गुरव, सांगावी, औंध व पुण्यातील अनेक परिसरातील तरुण उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या नोकरी मिळाव्यास १० वी, १२ वी, पदवीधर व डिप्लोमा होल्डर तसेच आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांच्या नोकरी करिता अर्ज करून मुलाखती दिल्या. या नोकरी मेळाव्यात जवळपास ३०० ते ३५० उमेदवार नोकरीकरिता अर्ज केले होते. तसेच मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवरांना नियुक्ती पत्र ही देण्यात आले. या नोकरी मिळाव्यात एकूण २० कंपन्यांच्या प्रतिनिधिंनी सहभाग घेतलला होता. यावेळी परिसरातील अनेक तरुण तरुणींनी ह्या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सामाजिक कार्यकर्ते नितीन सोनवणे व सौ प्रमिता प्रमोद सोनवणे ह्यांनी केले होते. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे नवनिर्वाचित नगरसेवक शशिकांत कदम, तसेच युवा नेते शंतून डोळस, संतोष काची, अश्विन खुडे, फिरोज शेख, सूरेश सकट, मनोहर पाटील सामाजिक कार्यकर्ते अरविंद कदम, पराग कांबळे, विज्ञान रणदिवे उपस्थित होते.
u