निधन

खडकी बाजार येथे सर्व राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

खडकी बाजार येथे सर्व राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

पुणे : दि. ३०. खडकी बाजार येथे सर्व राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालक मंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना खडकी येथील डी. आर. गांधी चौकात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी खडकी भागातील सर्वपक्षीय व समस्त खडकीकर नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, शिव सेना, भाजपा, मनसे, खडकी मुस्लिम मंच, अखिल खडकी बौध्द समाज कृती समिती, वंदे मातरम संघटना, छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोहत्सव समिती, भारती संविधान प्रभोधन मंच, खडकी व्यापारी संघटना, मनिष आनंद मित्र परिवार, स्व, तुकाराम भापकर प्रतिष्ठान, स्व. शरद चासकर प्रतिष्ठान, साम्राज्य प्रतिष्ठान, समूह फाऊंडेशन, धमभूमी सेवा संघ, खडकी अडतदार असोसिएशन, लूंबिनी कुंज बुद्ध विहार,खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष अभय सावंत तसेच खडकी भागातील सर्व सार्वजनिक मंडळे यांचे कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते. या शोक सभेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हर्षद (आप्पा) बोडके, अमित सावंत, लोकेश (आण्णा) मोरे, व निशिकांत कांबळे, बाळासाहेब आहेर यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button