पुणे महापालिकेसाठी भाजपकडून गटनेते पदी गणेश बिडकर एकमताने निवड…

पुणे महापालिकेसाठी भाजपकडून गटनेते पदी गणेश बिडकर एकमताने निवड…
पुणे; दि.३०(शशिकांत पाटोळे) : भाजपच्या ११९ नगरसेवकांनी एकत्र येत ‘पुणे महानपालिका भारतीय जनता पार्टी गट’ स्थापन करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. यामध्ये गणेश बिडकर यांची गटनेते पदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये महापालिका निवडणूका पार पडल्या आहेत. २९ महापालिकांसाठी मतदान पार पडले असून भाजपला भरघोस यश मिळाले. पुणे महापालिकेमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेवर भाजपचाच झेंडा आणि भाजपचाच महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी आता राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, पुणे महानगरपालिका भाजपा गटनेते पदी गणेश बिडकर यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचे ११९ नगरसेवक निवडून आले आहेत. या सर्व नवनिर्वाचित नगरसेविकांची बैठक पार पडली. यामध्ये भाजपच्या ११९ नगरसेवकांनी एकत्र येत ‘पुणे महानपालिका भारतीय जनता पार्टी गट’ स्थापन करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. नगरसेवकांची ही बैठक २७ जानेवारी २०२६ रोजी पार पडली. या संदर्भातील पत्र भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने पुणे महापालिका आयुक्तांना पाठवण्यात आले आहे.




