राजकीयराजकीय

पुण्याचे उपमहापौर परशूराम वाडेकर मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

पुण्याचे उपमहापौर परशूराम वाडेकर मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

पुणे; दि. ०३. (शशिकांत पाटोळे) : पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाबाबत काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने महापौर व उपमहापौर पदासाठी नावांची अधिकृत घोषणा केली आहे. त्यानुसार मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी निवड करण्यात आली असून, परशुराम वाडेकर यांची पुण्याच्या उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा भाजप नेते धीरज घाटे यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात चंद्रकांत दादा पाटील यांना फोन करून उपमहापौर पदासाठी रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर यांचे नाव निश्चित करण्यासाठी सांगितले. गेल्या टर्म मध्ये त्यांच्या पत्नी सौ. सुनीताताई वाडेकर यांनी उपमहापौर पद भूषविले होते. आज त्याच पाठोपाठ परशुराम वाडेकर यांच्या नावाचे उपमहापौर पदासाठी घोषणा करण्यात आली. रिपब्लिकन पक्षामध्ये उपमहापौर पदाचा मान मिळावीविणारे हे पहिलेच पती-पत्नी ठरणार आहेत. परशुराम वाडेकर हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे ज्येष्ठ नेते असून, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. वाडेकर यांना सुमारे २५ वर्षांचा राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कामाचा अनुभव असून ते दलित चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सध्या त्यांच्याकडे आरपीआयकडून पश्चिम महाराष्ट्राची संघटनात्मक जबाबदारी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button