Uncategorized

खडकीतील वंदे मातरम् संघटनेच्या वतीने शाहिद दिनानिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : दि. २५. शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शाहिद दिनानिमित्त वंदे मातरम् संघटनेच्या वतीने शहिद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराला खडकी परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी खडकी बोपोडी औंध दापोडी तसेच खडकीतील देशप्रेमींनी रक्तदान केले. शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना साम्रावादी ब्रिटिशांनी २३ मार्च १९३१ रोजी फासावर दिले होते. त्यावेळी या शहीदांचे वय पंचवीस सुद्धा नव्हते. त्यांनी आपल्या बलिदानातून एक प्रेरणादायी संदेश या देशातील तणांना शेतकऱ्यांना आणि कामगारांना दिलेला आहे. देशाच्या ७५ वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही आज फारशी परिस्थिती बदललेली नाही. म्हणून या शहीदांचे मार्गदर्शन आणि त्यांचे रण कन देशांमध्ये राजकीय हस्तक्षेप करण्यासाठी तण वर्गाने पुढाकार घेतला पाहिजे, या शिबिराचे आयोजन खडकीतील श्री राम मंदिरात करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन वंदे मातरम् संघटनेचे प्रांत अध्यक्ष विकास हांडे आणि प्रांत कार्याध्यक्ष राजेश शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दीप प्रज्वलनाचा मान शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष इंद्रकुमार बंसल यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात एकूण १५७ लोकांनी रक्तदात्यांची रक्तदान करून देश सेवा व समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे. गेली ३७ वर्षांपासून खडकीतील वंदे मातरम् संघटना या रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहे. या शिबिरात ४० ते ५० नागरिकांचे हिमोग्लोबिन कमी असल्याने त्यांना रक्तदान करता आले नाही. यावेळी वंदे मातरम संघटनेचे पदाधिकारी राजेश राजपूत, आनंद रेड्डी, विनोद काळे, दीपक चार्य, आशिष अग्रवाल, करण चव्हाण, विकी सारसर, आनंद चंडालिया, प्रतीक परदेशी व इतर सभासद उपस्थित होते. यावेळी या शिबिराचे सूत्रसंचालन खडकी विभाग सदस्य राजेश काकडे यांनी केले. तर प्रस्ताविक खडकी विभाग अध्यक्ष शिरीष रोच यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button