Uncategorized

खडकीतील वंदेमातरम संघटनेच्या वतीने पहलगाम (काश्मीर) दहशद वादी हल्ल्याचा तीव्र निषेध

पुणे : दि. २७ खडकीतील वंदे मातरम संघटनेच्या वतीने संघटनेच्या कार्यालयात समोर खडकीतील समस्त हिंदू समाज व समस्त नागरिकांच्या वतीने पहलगाम (काश्मीर) येथे इस्लामिक दहशतवादाच्या हल्ल्यात बळी पडलेल्या हिंदू बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी परिसरातील नागरिकांनी मेणबत्ती पेटवून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी वंदे मातरम चौकात दहशतवाद्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाकिस्तान मुर्दाबाद!”, “भारत माता की जय!”, “जय श्रीराम!”, “हिंदू एकता जिंदाबाद!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. तसेच पाकिस्तानचा आणि दहशतवादाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सर्वांनी एकजूट दाखवत देशविरोधी शक्तींच्या विरोधात कठोर भूमिका घेण्याचा तसेच देशाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी वंदे मातरम संघटनेचे प्रांत अध्यक्ष विकास हांडे, प्रांत कार्यध्याक्ष राजेश शर्मा, खडकी विभागाध्यक्ष शिरीष रोच, मालोजी गादेवार, खडकी कॅन्टोमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अभय सावंत, कमलेश चासकर, खडकी विभाग भाजप अध्यक्ष शाम काची, व खडकीतील सकल हिंदू समाजातील तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रम आयोजन दिपक चार्य, आशिष आगरवाल, आनंद रेड्डी, करण चव्हाण यांनी केले तर या कार्यक्रमचे सूत्रसंचालन राजेश काकडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button