सातारा : दि. १६. सातारा येथील मेणवली ता.वाई येथे महामानव विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या गावातील सर्वात महत्वाचे म्हणजे मेणवली गाव हे ऐतिहासिक असून सर्वधर्म समभाव जोपासणारे अशी गावाची ख्याती आहे. विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती निमित्त सर वर्षी आरोग्यशिबिर, लहान मुलांसाठी वाचण्यासाठी महापुरुषांची पुस्तके लहान मुलांना भेट म्हणून देण्यात येते. या गावातील मोठं मोठ्या अधिकाऱ्यांचे व्याखाने आयोजित केले जातात. तसेच अनेक विविध उपक्रम राबवून दर वर्षी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी केली जाते. रात्री संपूर्ण गावातून मिरवणुककाढली जाते. या मिरवणुकीत गावातील समस्त बौद्धजन मंडळ, मिलिंद तरुण मित्र मंडळ, माता रमाई स्नेहवर्धक महिला मंडळ, ग्रामस्थ, सर्व युवक मंडळे, जेष्ठ नागरिक ग्रामपंचायत मेणवली व सर्व आजी-माजी पदाधिकारी तसेच जाती-धर्मातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यन्तचे व्याक्ती या मिरवणुकीत सहभाग घेतात.