छावा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्काराने साठे, कांबळे, पाटील, खोले, सुप्रिया यादव यांना पुरस्काराणे सन्मानित

मुंबई : दि. २२. संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक असा छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गंडाकुश यांनी मराठी साहित्य मंदिर सभागृह, वाशी, नवी मुंबई या ठिकाणी केले होते. छावा प्रतिष्ठानच्या वतीने २१ मे २०२५ रोजी या पुरस्कारासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील क्रिडा क्षेत्रासाठी सुनील साठे, राजेंद्र कांबळे, विष्णुपंत पाटील, सुधा खोले, सुप्रिया यादव व पुणे शहर येथील श्री.अजय कांबळे तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य म्हणून श्री.काळूराम लांडगे, डॉ. व नगरसेवक विश्वास गजरमल, राहूल साळुंके व शेती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुभाषफक्त. माकर यांना छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार* प्रसिद्ध सिने अभिनेते संभाजी माने व प्रसिद्ध सिने अभिनेत्री कुमुदिनी अदाटे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर कराडचे आमदार मनोज घोरपडे, वैभव नाईक युवा नेते, सरनोबत अमित गाडे पाटील (छत्रपती संभाजी महाराज यांचे दूधभाऊ यांचे वंशज), सुभेदार कुणाल दादा मालुसरे (नरविर सुभेदार तानाजी बाबा मालुसरे यांचे वंशज), सरसेनापती राजेंद्र मोहिते पाटील (सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज), सचिन दादा भोसले, विजय राऊत (ए पी आय रायगड पोलीस) इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन वस्ताद डॉ अमित गंडाकुंश (छावा प्रतिष्ठान) यांनी केले होते.