Uncategorized

कॅन्टोमेंट सफाई कर्मचाऱ्याच्या वारसानां मिळणार नोकरी

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

पुणे : दि. २७. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी खडकी कॅन्टोमेंट बोर्डातील रेंजहिल्स वाइंडिंग कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्याशी थेट संवाद साधला, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार त्यांच्या वारसांना नोकरी मिळावी यासाठी ठोस पावले उचलणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. तसेच खडकीतील सामाजिक कार्यकर्ते राजेश कमलदास काकडे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी माहित असलयाने आयोगाचे अध्यक्ष डागोर यांना खडकीत जाण्यासाठी त्याचा मोठा वाटा आहे. यावेळी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचा सन्मान खडकीतील वंदे मातरम संघटना व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने करण्यात आला. शेरसिंग डागोर यांनी एक महत्त्वाचे आश्वासन दिले की, लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार त्यांच्या जी आर ०२/२०२३ मध्ये (कटक-मंडळ) कॅन्टोन्मेंट बोर्ड असा उल्लेख करण्यात आला असून त्या अनुषघाने सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी मिळावी यासाठी ते स्वतः पुढाकार घेणार आहेत. तसेच, खडकी, देहूरोड, पुणे व अन्य सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या सीईओ आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करून, या विषयावर सखोल चर्चा करण्यात येईल. सर्व संबंधित मुद्दे त्या बैठकीत मांडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.तसेच सर्व सफाई कर्मचाऱ्याच्या आशा उंचावल्या कि कामगारांच्या हक्कांसाठी आणि भविष्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. याप्रसंगी खडकी वंदे मातरम संघटनेचे प्रांत कार्याध्यक्ष राजेश शर्मा, विभाग अध्यक्ष शिरीष रोच, दिनेश वर्मा सर, तसेच बाल्मिक समाजाचे आनंद चंडालिया, नारायण पवार,अनिल जाधव, राजेश कल्याणा, करण चव्हाण व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button