श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने खडकीतील १० वी -१२ वी तील ९५ उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने खडकीतील १० वी -१२ वी तील ९५ उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

पुणे : दि. १४. खडकीत येथील श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने १० वी १२ वी मधील ९५ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह , प्रशस्तिपत्रक व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे प्रभूश्रीराम यांच्या महाआरतीने वातावरण मंत्रमुग्ध झाले कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी घेतलेली मर्यादेची शपथ. आई वडिलांचा मान, देव देश धर्माचा अभिमान , सत्याची कास व राष्ट्रहित या मूल्यांवर कायम पुढे जाण्याची शपथ सर्व विद्यार्थ्यांनी घेतली. सत्कार सोहळ्या नंतर निवडक विद्यार्थी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.विशेष क्रीडा पुरस्काराचे मानकरी सतीश राजहंस , मिथिलेश बाडोलीया, सचिन शिराळे या तिघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करून खडकी व देशाचे नाव वाढविले असल्यामुळे तिघांना विशेष क्रीडा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी विवेक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व श्रीराम मंदिर देवस्थान हि धार्मिक संस्था असून सुद्धा अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर राबवत असल्यामुळे ट्रस्टचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाच्या प्रमुख महाराष्ट्र एज्युकेशन 4 मा.संचालक व उद्योगपतीe3 विवेक शिंदे, अध्यक्षस्थानी भवरलाल जैन, श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मुख्य विश्वस्त नरेंद्र बागनाईक, प्रशांत पृथ्वीराज, मिलिंद पोत्रे, संजय टेकाडे, स्नेहल पृथ्वीराज, दत्तात्रय मसेकर, अनिकेत अय्यावार, शैलेश फुलेल्लू, प्रवीण अय्यावार, सर्वजीत बागनाईक व रेणुका पृथ्वीराज यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन ह.भ.प वैभव वारके यांनी केले.s




